-
खास प्रतिनिधी
सुरतच्या सत्र न्यायालयाने कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवल्यानंतर तब्बल १० दिवसांनी राहुल गांधी यांनी न्यायालयापुढे या शिक्षेला स्थगितीसाठी अर्ज दाखल केला तर गुजरात उच्च न्यायालयात महिनाभरानंतर पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने केवळ शिक्षेचे राजकीय भांडवल करण्यासाठी गांधी यांनी न्यायालयात शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी उशीर केला का? असा सवाल केला जात आहे.
आताच का ही चर्चा सुरू?
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शिक्षा आणि त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द होणे, या विषयाची चर्चा राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या शिक्षेनिमित्त सुरू झाली. कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. त्यामुळे राहुल गांधी यांच्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांचीही आमदारकी आणि मंत्रिपद जाणार का, यावरून या चर्चेला सुरुवात झाली. कोकाटे यांच्या शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाला तीन दिवस उलटूनही अद्याप तरी महाराष्ट्र विधिमंडळाने कोकाटे यांची आमदारकी किंवा मंत्रिपद रद्द करण्याची कारवाई केलेली नाही.
(हेही वाचा – प्रधानमंत्री आवास योजना पालिकांना सक्तीची करा; खासदार Naresh Mhaske यांची संसदेत मागणी)
उशीर किती?
यानिमित्त गांधी यांच्या शिक्षेनंतर घडलेल्या घडामोडींचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की गांधी (Rahul Gandhi) यांना २३ मार्च २०२३ या दिवशी न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आणि २४ मार्च २०२३ या दिवशी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर तब्बल १० दिवसांनी १० एप्रिल २०२३ या दिवशी गांधी यांनी शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. तर २५ एप्रिल २०२३ या दिवशी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले.
शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी गेली आणि त्यांचे त्यांनी भांडवल केले. ते करण्यासाठी कालावधी मिळावा म्हणून तर गांधी यांनी शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी वेळ काढला का? असाही सवाल केला जात आहे.
राहुल गांधी यांचे प्रकरण काय आहे?
२०१९ च्या लोकसभा निवडणुक प्रचारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या भाषणात “मोदी हे सर्व चोरांचे आडनाव आहे,” अशी टिप्पणी केली होती. त्याला भाजपा नेते पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या कोर्टात गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या नागरिकांची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट २०२३ या दिवशी शिक्षेला स्थगिती दिली आणि गांधी यांची खासदारकी त्यांना परत मिळाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community