भारताचे Constitution खरोखरच धोक्यात आहे का?

महाविकास आघाडीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाबासाहेब आंबेडकर हे दलित असल्याने त्यांनी लिहिलेले संविधान बदलायचे आहे अशाप्रकारचा प्रचार केला जात आहे.

171
भारताचे Constitution खरोखरच धोक्यात आहे का?

उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीचा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा हा संविधान बचाव हाच असून शरद पवार यांनी संविधान वाचवण्यासाठी आपली ही लढाई असल्याची भावनिक हाक वांद्रे कुर्ला संकुलातील सभेत बोलतांना दिली. मात्र, संविधानाची मुळ प्रत कपाटात बंद करून त्यातील पहिले पान फाडून त्यातील चित्रप्रतही फाडून टाकण्याचे काम काँग्रेसच्या काळात तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरुंनी केल्याचा आरोप करत कोणत्याही दलित बांधवाला आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही आणि काँग्रेसचा हा डाव हाणून पाडू असाही निर्धार मोदी यांनी बोलून दाखवला. (Constitution)

महाविकास आघाडीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना बाबासाहेब आंबेडकर हे दलित असल्याने त्यांनी लिहिलेले संविधान बदलायचे आहे अशाप्रकारचा प्रचार केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हाच प्रमुख निवडणुकीचा मुद्दा आहे. बीकेसीतील प्रचाराच्या निवडणुकीत शरद पवार यांनी  संविधान वाचवण्यासाठी आपली लढाई असल्याचे सांगत लढाई बाबासाहेबांचे संविधान वाचवण्यासाठी असल्याचा पुनरुच्चार केला. उद्धव ठाकरे यांच्याकडूनही असाच आरोप केला जात आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत या भारतात बाबासाहेबांनी जे उभे केले, त्या संविधानाला आपण धक्का लावणारच नाही. पण जे विरोधक प्रचार करतात त्यांची तोंडे बंद करावीत, असे आवाहन मोदींना केले. (Constitution)

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी ‘तमाम हिंदू बांधवांनो’ म्हणणे सोडून दिले; Devendra Fadanvis यांची ठाकरेंवर बोचरी टीका )

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजीपार्क येथील सभेमध्ये जी संविधानाची पहिली प्रत आहे, त्या संविधानासंदर्भातील पहिल्या पानावर चित्र साकारले होते, ती प्रतच पंडित नेहरुंनी कपाटात ठेवून त्याचे पहिले पानच फाडून टाकल्याचा आरोप केला. कारण काँग्रेसला दलित बांधवांना आरक्षण द्यायचे नव्हते, त्यांचा तो डाव मी पंतप्रधान असे पर्यंत सफल होऊ देणार नाही. हीच वेळ आहे. त्यामुळे मुंबईकर हे रेकॉर्ड ब्रेक मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Constitution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.