Uddhav Thackeray हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार?

240
Uddhav Thackeray हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा उद्या १९ जूनला ५८ वा वर्धापन दिन असून शिवसेना (शिंदे) तसेच शिवसेना उबाठा गटाकडून हा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये एका निर्णयाद्वारे शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले, तसेच उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना उबाठा’ हा पक्ष आणि ‘मशाल’ हे चिन्ह दिल्याने उद्धव ठाकरे हे उद्या, बुधवारी १९ जूनला शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा का करीत आहेत? असा सवाल केला जात आहे. (Uddhav Thackeray)

..आणि उद्धव ठाकरे यांना नवा पक्ष, चिन्ह मिळाले

शिवसेनेत उभी फूट पडली आणि ४० आमदारांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून खरी शिवसेना शिंदे यांचीच असल्याचा निर्णय देत ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्हही शिंदे यांनाच दिले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेल्या ‘शिवसेना उबाठा’ आणि ‘मशाल’ यालाही मान्यता दिली आणि उद्धव ठाकरे यांना नवा पक्ष आणि चिन्ह मिळाले. त्यानंतर प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेले. तिथेही विधानसभा अध्यक्षांनी मूळ शिवसेना शिंदे यांचीच असल्याचा निर्वाळा दिला. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Igor Stimac Removed : फुटबॉल प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक यांची अखेर गच्छंती)

उबाठाचा वर्धापन दिन १८ फेब्रुवारीच!

त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना उबाठा या पक्षाच्या नावावर आणि ‘मशाल’ चिन्हावर २१ मतदार संघात उमेदवार उभे केले आणि ९ खासदार निवडून आणले तर शिंदे यांनी शिवसना पक्षाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्हावर १५ जागा लढवल्या आणि ७ खासदार निवडून आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा अधिकृत पहिला वर्धापन दिन हा खऱ्या अर्थाने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी असणे अपेक्षित होते. तर १९ जून हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन शिंदे यांनी साजरा करणे क्रमप्राप्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Uddhav Thackeray)

राऊत यांचा नकळत दुजोरा

शिवसेना उबाठा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज १८ जूनला सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन १९ जूनला साजरा करणार आहेत. “असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले. मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे,” अशी तुलना करत राऊत यांनी मूळ शिवसेना फूटून शिवसेना उबाठा स्थापन झाला आणि मूळ शिवसेना (शिंदे) पक्ष आजही आहे, यालाच नकळत दुजोरा दिला. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.