महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भुषवणाऱ्या छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) आवरा, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना करण्यात आली आहे. नवे मित्र जोडण्याच्या नादात पारंपरिक मतदार गमविण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही संघाने दिला आहे.
संभाजी भिडे गुरुजींवर टीका करताना मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर भुजबळांविरोधात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दखल घेतली असून, भुजबळांची याआधीची विधाने पाहता त्यांना तात्काळ आवर घालण्याची गरज आहे, अशी सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना केली आहे.
(हेही वाचा – MLA Disqualification : शिवसेनेकडून सहा हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभाध्यक्षांकडे सादर)
दरम्यान, भुजबळांनी (Chhagan Bhujbal) विरोधी पक्षात असताना, विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीची प्रतिमा शाळेमध्ये लावण्यास विरोध केला होता. आता भाजपासोबत सत्तेत आल्यानंतर त्यांची भूमिका बदलेल, अशी अपेक्षा असताना त्यांनी पूर्वीचाच सूर आळवला आहे. त्यामुळे भाजपाचीही कोंडी झाली आहे. परिणामी, भुजबळांना मंत्रिपदावरून बाजुला करा, अशी मागणी थेट भाजपामधूनच होऊ लागल्याने वरिष्ठांसमोर पेच निर्माण झाला आहे.
मंत्रिपद धोक्यात
देवी शारदा आणि ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भुजबळांनी (Chhagan Bhujbal) माफी मागावी, अशी अपेक्षा भाजपाने राष्ट्रवादीकडे व्यक्त केली होती. अजित पवारांनी तशी विनंती भुजबळांना केली होती. मात्र, आपण विधानावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. त्यामुळे भुजबळांचे (Chhagan Bhujbal) मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community