शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात यासारखे दुसरे दुर्दैव काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार, खासदार,तसेच पदाधिकारी सहभागी झाल्याने, शिंदे गटाने शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरु असून दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, कोणती शिवसेना खरी आहे त्याचा पुरावा महाराष्ट्रातील 11 कोटी जनता आहे. शिवसेनेसाठी बलिदान दिलेले 69 हुतात्मे, हजारो आंदोलनातून आमचे शिवसैनिक, मराठी बांधव हुतात्मा झाले, तुरुगांत गेले. तसेच, 1992 दंगलीत आमच्यासह हजारो लोकांविरुद्ध खटले दाखले झाले. महाराष्ट्राच्या मातीत, मराठी माणसांच्या रक्तात आणि मनगटात शिवसेना आहे, हाच पुरावा आहे, असे राऊत म्हणाले.
8 ऑगस्टाला निर्णय शिवसेना कोणाची?
शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की, उद्धव ठाकरे यांची या फैसला निवडणूक आयोग करणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिल्याचे समजते आहे. दोन्ही बाजूंचे दावे ऐकल्यानंतर, निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.
Join Our WhatsApp Community