ठाकरे घराण्यातील दूसरा युवराज निवडणुकीच्या रिंगणात; Amit Thackeray कुठून लढणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ४५ उमेदवारांची यादी मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी जाहीर केली.

333

ठाकरे घराण्यातून निवडणुकीच्या राजकरणात न उतरण्याचा शिरस्ता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवला होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवत प्रथमच ठाकरे घरण्यातून तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्या पाठोपाठ आता ठाकरे घराण्यातील दुसरे युवराज अमित ठाकरे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम येथून मनसेने उमेदवारी जाहीर केली आहे.

(हेही वाचा MNS कडून ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती निष्ठावंतांना मिळाली संधी?)

मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ४५ उमेदवारांची यादी मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी जाहीर केली. त्यामध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) प्रथमच निवडणुकीच्या राजकारणात उतरले आहेत. अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडून लढवणार आहेत. तर वरळीतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. यंदा मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवत आहे. त्यासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह शहरी भागांमधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या  निवडणुकीत मनसे दोन आकडी आमदार निवडून आणतील, अशी राजकीय तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. तर स्वतः राज ठाकरे यांनी या निवडणुकीनंतर मनसे सत्तेतील पक्ष असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी विधिमंडळात मनसेचे नेतृत्व करताना अमित ठाकरे (Amit Thackeray) दिसतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.