वंदना बर्वे
२०२४ च्या लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, तेलंगणा आणि केरळमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करू शकतात. दरम्यान पंजाब प्रदेश भाजपचे अध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी राजीनामा दिला. मात्र, त्याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. सुनील जाखड यांच्याकडे पंजाब भाजपची सूत्रे सोपवली जाऊ शकते. जाखड काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत.
या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये भाजपचे सरकार आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि तेलंगणात बीआरएसची सत्ता आहे. यावर्षी ४ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये त्रिपुरामध्ये युती करून पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. आणि मेघालय, नागालँडमध्येही ते सरकारमधील सहयोगी आहेत. कर्नाटकातच पक्षाला सत्ता गमवावी लागली. ६, ७ आणि ८ जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष प्रादेशिक नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. भाजप पहिल्यांदाच मोर्चाचे अध्यक्ष आणि तीन झोनच्या (पूर्व, उत्तर आणि दक्षिण) सरचिटणीसांच्या बैठका घेणार आहे.
(हेही वाचा – सलग दुसऱ्या दिवशी अंबानी कुटुंबाची ईडी चौकशी; टीना अंबानी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल)
६ जुलै रोजी गुवाहाटीमध्ये पूर्वेकडील १२ राज्यांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममधील नेत्यांचा समावेश असेल.
७ जुलै रोजी दिल्लीत उत्तरेकडील १३ राज्यांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदिगड, जम्मू-काश्मीर, लडाख, गुजरात आणि दमण दीव-दादर नगर हवेली येथील नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे.
८ जुलै रोजी हैदराबादमध्ये दक्षिणेकडील ११ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, गोवा, अंदमान आणि निकोबार, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community