- खास प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि काँग्रेस पक्षांनी शिवसेनेत (शिंदे) अंतर्गत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात वादाची ठिणगी उबाठा आणि काँग्रेस यांच्यातच पडली. (Shiv Sena UBT-Congress)
ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं
विधानसभेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी २० जानेवारी २०२५ या दिवशी पत्रकारांशी बोलताना ‘उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं’ असं वक्तव्य केलं आणि शिवसेना उबाठाला तेच प्रचंड झोंबलं. (Shiv Sena UBT-Congress)
(हेही वाचा – पालकमंत्री पदावरून कोणतेही वाद नाहीत; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची स्पष्टोक्ती)
काँग्रेसवाले कुठे आहेत?
“उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन ‘उदय’ पुढे येईल,” असं विधान काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केलं. याबाबत ऊबाठा प्रवक्ते संजय राऊत यांना पत्रकारांनी छेडले असता, राऊत संतापले. “उद्धव ठाकरे संपलेले नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही संपवण्याच्या वल्गना केल्या गेल्या. पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. उद्धव ठाकरे यांना संपवल्याची भाषा काँग्रेसवाले करत आहेत. काँग्रेसवाले कुठे आहेत?” असा उलटप्रश्न राऊत यांनी काँग्रेसला केला. (Shiv Sena UBT-Congress)
शिवसेना संपली नाही
राऊत पुढे म्हणाले, “शिवसेना संपली नाही आणि शिवसेना संपणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा उसळी घेऊ,” अशा शब्दात काँग्रेस नेते वडेट्टीवार यांना सुनावत भाजपावर घसरले. (Shiv Sena UBT-Congress)
(हेही वाचा – संजय राऊत केवळ बोलघेवडेपणा करू शकतात; भाजपा गटनेते Pravin Darekar यांची टीका)
वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न
“उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन ‘उदय’ पुढे येईल,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांच्या माध्यमातून शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडेल असे भाकीत व्यक्त केले. तर उदय सामंत सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे २० ते २४ जानेवारी २०२५, असे चार दिवस ‘जागतिक आर्थिक परिषदे’साठी गेले आहेत. तिथूनच सामंत यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. “राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यात मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचे दोनदा उद्योगमंत्रीपद मिळालं याची मला पूर्णपणे जाणीव आहे. अशा सर्वसामान्य नेत्याने माझ्या राजकीय जीवनासाठी मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत. ते मी कधीच विसरु शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळं कोणीही आमच्यात वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही,’ असं सामंत यांनी ‘X’ या समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्ट केलं. (Shiv Sena UBT-Congress)
वडेट्टीवार-फडणवीस भेट
‘एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार आणि मी आपण सर्व सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहोत. त्याच्यामुळे दोन सर्वसाधारण कुटुंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला नेण्याचं षडयंत्र तुम्ही करु नका. तुम्हीदेखील भाजपामध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटलात, याची मला माहिती आहे. पण मी काही राजकीय शिष्टाचार पाळतो आणि म्हणून मी कधीच वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी षडयंत्र करु नका,” असं सामंतांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. (Shiv Sena UBT-Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community