उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दणका देत, पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर आता शिंदे गट म्हणजेच शिवसेनेने विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आहे. आधी या कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे होता. इतकंच नाही, तर अनेक शाखाही लवकरच शिंदे गट आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. असे असतानाच उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांची आमदारकीही जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात बैठकीचे आयोजन केले होते. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. मात्र, ठाकरे गटाचे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
( हेही वाचा: ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले; याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास नकार )
पिता- पुत्रांची आमदारकी जाणार?
भरत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचे संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. व्हिप जुगारल्यास निलंबन होणार का? असा सवाल उपस्थित केल्यावर तो निर्णय बैठकीनंतर होईल. आमचे खासदार ठरवतील, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची आमदारकी जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Join Our WhatsApp Community