आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले!

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनवरील फॉल सिलींग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत. अतिथीगृहात बैठक सुरू असतानाच अपघात होऊन, फॉल सिलींग कोसळल्याची घटना घडली आहे.

सर्वजण सुखरुप

सह्याद्री अतिथीगृहातील 4 क्रमांकाच्या हॉल बाहेरील फॉल सिलींग अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.

मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले!

सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. संध्याकाळी 4.45 मिनिटांनी सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दूर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दूर्घटना जीवघेणी होती, त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here