अविवेकाची काजळी दूर होणार, सरसंघचालकांनी व्यक्त केला विश्वास

180

समाजातील हिंसा, दुराचाराचे अखेरची दिवस सुरू आहेत. सध्या समाजात समता प्रस्थापित करण्याची गरज असून न्याय, सद्भावना आणि विवेकाला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. त्यामुळे अविवेकाची काजळी दूर होणार असल्याचा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला आहे.

… हे या समाजाचे वेगळेपण

याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, मंदिराच्या बाहेर दंडा घेऊन त्यांचे रक्षण करण्याचे काम स्वयंसेवकांचे आहे. येथे उपस्थित संत समाजाने मला इथे बोलावले आणि सिंधी समाजातील संतांना ऐकण्याचं भाग्य मला लाभले देशाच्या फाळणीच्या वेळी काही लोकांनी धर्म वाचवण्यासाठी आपल्या जमिनी सोडून भारतात आले तर काही जण धर्म आणि व्यवसाय वाचवण्यासाठी पाकिस्तानातच ठाम उभे राहिले, हे या समाजाचे वेगळेपण आहे.

(हेही वाचा – RBI चा डिजिटल रुपया कधी येणार भारतात? अर्थमंत्र्यांनी सांगितली तारीख)

भारतात आल्यानंतर सिंधी समाजाने स्वतःला केले समृद्ध 

भारतात आल्यानंतर सिंधी समाजाने स्वतःला समृद्ध बनवले. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि समाजासाठी दिलेले योगदान हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक जाती-धर्माला वाटते तसे सिंधी समाजाने संकल्प केलेल्या श्री कवर धाम सिंधू सनातन वैदिक अभ्यास विश्वविद्यालय कवर धाम इंटरनॅशनल फाउंडेशन अशा विविध गोष्टी पूर्णत्वास जात आहेत. या सर्वाला आमच्या शुभेच्छा आहेत. या गोष्टी पूर्णत्वास जाण्यासाठी सरकारला सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. सरकार सकारात्मक व्हावे यासाठी दबाव निर्माण होणे सुद्धा आवश्यक आहे. सत्य सत्य सद्भावना व चांगुलपणा प्रत्येक समाजामध्ये रुजण्यास सर्वांचे जगणे समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमरावती शहरालगतच्या संत कंवर धाम येथील अमर शहीद संत कवर राम यांच्या चतुर्थ ज्योती साई राजेश लाल यांच्या पीठारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देवनाथ मठाचे जितेंद्रनाथ महाराज, शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, मुस्लिम राष्ट्रीय एकता विचार मंचचे इंद्रेश कुमार, विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत हरताळकर, नानक आहुजा प्रामुख्याने उपस्थितीत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.