विधानसभा अध्यक्षांनी असा निर्णय दिला की, सर्वोच्च न्यायालय अजून विचारच करतेय; Jayant Patil यांची कोपरखळी

220
Assembly Session : आमदारांच्या बोलण्यावर चाप लावावा!
राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष पदावर ऍड. राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर दोन्ही बाजूंची भाषणे झाली. त्यावेकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या भाषणात फटकेबाजी केली. अध्यक्षांच्या मागील अडीच वर्षाच्या कालखंडातील घडामोडींचा उल्लेख करताना पाटील यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर बोलताना अध्यक्षांनी त्यावेळी कोर्टच चालवले होते, त्यावेळीही कुठेही पक्षपातीपणा केला नाही, त्यांनी निर्णय देताना कुणालाच अपात्र केले नाही. त्यांच्या या निर्णयावर अजून सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही, न्यायालय अजून विचारच करत आहे, त्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती घरीदेखील गेले, अशा शब्दांत त्यांनी (Jayant Patil) कोपरखळी मारली.

काय म्हणाले जयंत पाटील? 

राहुल नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. तुम्हाला खासगीत सांगायचो की, परत संधी मिळाली की, मंत्री व्हा. तु्म्ही मंत्री झालात तर जास्त चांगले होईल, असा सल्ला दिला होता. पण शेवटी पक्षाचा निर्णय आहे, त्याबाबत खोलात जायचे नाही. अलीकडच्या काळात सासऱ्यांचे किती ऐकता, हे मला चांगलेच कळायला लागले आहे. तुम्ही गेल्या अडीच वर्षात विधानसभा अध्यक्ष असताना वाद घालण्यासाठी आलेल्यांना गरम कॉफी देऊन पुन्हा घालवले. त्यांना मासे आणि जेवणही खाऊ घातले आहेत. तुमच्या काळात कामकाज सल्लागार समितीच्या बैठका व्हायच्या, त्याचा दर्जा बाकीच्या व्यवस्था असल्याने एवढा उंच गेला की, आपणच अध्यक्ष राहावे, अशी आमची तेव्हापासूनची मनोमन इच्छा होती, असेही जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.