विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांच्याकडून शासनाची कानउघडणी!

57
विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांच्याकडून शासनाची कानउघडणी!
  • खास प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शुक्रवारी फडणवीस सरकारचे रस्त्याच्या सिमेंटिकरणाच्या निकृष्ट कामावरून नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांनी आमदारांसोबत त्यांच्या विधानसभा मतदार संघातील रस्त्याच्या कामाबाबतची समस्या मंत्र्यांसमोर मांडली आणि ‘खड्डेमुक्त मुंबई’सारख्या एका चांगल्या उद्देशाने सुरू केलेल्या संकल्पनेला गालबोट लागेल, अशा शब्दांत राज्य सरकारची कानउघडणी केली.

कामे निकृष्ट दर्जाची

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटची सुरु असलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडला. मुंबईत रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे अभिनंदन केले. भातखळकर यांनी पुढे बोलताना, अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे, अनेक ठिकाणी कामात दिरंगाई, यंत्रणेची ढिलाई असून वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर, लोकप्रतिनिधिनी आवाज उठवल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली याकडे लक्ष वेधले.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ मध्ये किमान 20 हजारांची असणार उपस्थिती)

२९ इंजिनिअर्सना समज

भातखळकर पुढे म्हणाले, “महापालिकेने २९ इंजिनिअर्सना समज दिली. समज दिली म्हणजे काय? ते कसला पगार घेतात? जे काम झाले आहे त्याचे पुन्हा एकदा ऑडिट होणार का? आणि दंडाची रक्कम वाढवणार का? पर्यवेक्षक, इंजिनिअर्सवर काय कारवाई करणार? चार कंत्राटदारांना आणि गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सी यांना एकूण ३.४ कोटी असा दंड ठोठावला असून आकारण्यात आलेला दंड हा प्रकल्पाच्या प्रमाणात अत्यंत नगण्य आहे,” असे मत मांडले.

किती कामे पूर्ण?

यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना सांगितले की, रस्ते सिमेंटीकरणाची कामे दोन टप्प्यात सुरू असून पहिल्या टप्प्यात १९१ रस्त्यांची कामे आहेत त्यातील ४५ रस्ते पूर्ण, दुसऱ्या टप्प्यात १०३ रस्ते, चौथ्या टप्प्यात ४७ रस्ते पूर्ण करण्यात आले, अशी माहिती दिली. (Rahul Narvekar)

(हेही वाचा – न्यायाधीशांच्या घरात सापडलं घबाड ; Supreme Court ने दिले चौकशीचे आदेश)

कंत्राटाची किंमत रू.६,६३२ कोटी

“बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये तडे आढल्याने पर्यवेक्षन करणाऱ्या ९१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देवून ताकीद देण्यात आली आहे. चार कंत्राटदारांना देण्यात आलेल्या कंत्राटाची एकूण किंमत रू.६,६३२ कोटी इतकी आहे. कंत्राटातील अटीं व शर्तीनुसार दोषयुक्त कामावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. दोषयुक्त कामाचे प्रमाण एकूण झालेल्या कामाच्या ०.४ टक्के इतके आढळून आलेले असून त्याप्रमाणात कंत्राटदारावर दंड आकारण्यात आला आहे,” असे उदय सामंत यांनी सांगितले. (Rahul Narvekar)

दोषयुक्त काम तोडून पुन्हा करणार

सामंत पुढे म्हणाले, “निविदेतील अटी व शर्ती नुसार दोषयुक्त काम तोडून टाकून नव्याने करणे व कामाच्या किंमती इतका दंड आकारण्याची तरतूद आहे. या प्रकरणी कंत्राटदार व गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेस दोषयुक्त कामाच्या दुप्पट म्हणजे प्रत्येकी रू.३.३७ कोटी इतका दंड आकारण्यात आला आहे. तसेच दोषयुक्त काम कंत्राटदाराकडून स्वखर्चाने नव्याने करून घेण्यात येत आहे. पर्यवेक्षन करणाऱ्या ९१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देवून त्यांचा खुलासा घेण्यात आला आहे. पर्यवेक्षणात काही त्रुटी आढळल्याने त्यांना समज देण्यात आली आहे.”

(हेही वाचा – वांद्रे पूर्वे येथे राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’ बांधणार; मंत्री Adv Ashish Shelar यांची घोषणा)

संकल्पनेला गालबोट लागेल

नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले, “खरं तर मला बोलायचं नव्हतं या विषयावर. पण मला बोलायला लागेल. माझ्या स्वतःच्या मतदार संघात (कुलाबा) दोन-अडीच वर्षांपूर्वी एक काम दिले गेले, पण कंत्राटदाराने काही एक काम केले नाही. सहा महिन्यांपूर्वी फेरनिविदा काढण्यात आली. अजूनही ते काम सुरू झाले नाही. ज्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून काढले त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली गेली नाही, फक्त कारणे दाखवा नोटिस दिली, दंड आकाराला, पण दंड वसुलीसाठी पालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याकडून चांगल्या उद्देशाने खड्डेमुक्त मुंबईसाठी ही कामे सुरू करण्यात आली. पण प्रशासनाकडून ज्या प्रकारची कार्यवाही होत आहे, त्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यानी सुरू केलेल्या संकल्पनेला निश्चित गालबोट लागेल, अशी परिस्थिति आज आहे,” अशा तीव्र शब्दांत अध्यक्षांनी शासनाची कानउघडणी केली.

अध्यक्षांच्या नाराजीनंतर, मंत्री उदय सामंत यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच अध्यक्षांनी दालनात या विषयावर एक बैठक आयोजित करावी, अशी विनंती सामंत यांनी नार्वेकर यांना केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.