औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे नामांतर करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. एवढी वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्हाला हे का सुचले नाही? आजचा दिवस यासाठी का निवडला? असे थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहेत.
राज्य सरकारला अधिकार नाही
ज्या ठिकाणी उच्च न्यायालय, विमानतळ, विभागीय कार्यालय, रेल्वे, मुख्य पोस्ट ऑफीस अशी महत्त्वाची कार्यालये असतात. अशा शहरांची नावे केंद्र सरकारच बदलू शकते. तो अधिकार राज्य सरकारांना नाही. आजपर्यंत जेवढी नावे बदलली गेली ती केंद्र सरकारकडून बदलली गेली.
( हेही वाचा: “मुंबई महानगरपालिका अभी बाकी है”; ट्वीटरवरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा )
हा निर्णय नसून प्रस्ताव
बाॅम्बेचे मुंबई यावर शिक्कामोर्तब केंद्र सरकारने केले. मद्रासचे चेन्नई, अलाहाबादचे प्रयागराज ही नावेदेखील केंद्र सरकारने बदलली. राज्य सरकारला आजच हा निर्णय का घ्यावा वाटला मुळात आजचा हा निर्णय नसून हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा लागेल. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. मात्र सध्याची परिस्थिती पाहता असा निर्णय घेण्यामागचा हेतू कोणापासूनही लपू शकत नाही,असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community