…कुणी पाणी देता का पाणी; Delhi Govt ची हाक

122
...कुणी पाणी देता का पाणी; Delhi Govt ची हाक

पाण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करणाऱ्या दिल्लीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी दाखल केलेल्या याचिकेत केजरीवाल सरकारने आवाहन केले आहे की, न्यायालयाने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशला एक महिन्यासाठी अतिरिक्त पाणी देण्याचे निर्देश द्यावेत. दिल्ली सरकारने म्हटले आहे की, उष्णतेमुळे शहरातील पाण्याची मागणी लक्षणीय वाढली आहे. शेजारील राज्यांनी दिल्लीला महिनाभर अधिक पाणी द्यावे, अशी सूचना करण्याची मागणी दिल्ली सरकारने केली आहे. (Delhi Govt)

केजरीवाल यांनी लिहिले – सध्या राजकारण करू नका

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही भाजपाला आवाहन केले आहे की, त्यांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सरकारांना महिनाभर पाणी देण्यास सांगावे. सीएम केजरीवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, कडक उन्हात पाण्याची मागणी खूप वाढली आहे. दिल्लीला शेजारील राज्यांतून मिळणारे पाणीही कमी झाले आहे; म्हणजे पुरवठा कमी झाला. हा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा आहे. भाजपाचे मित्र आमचा विरोध करत असल्याचे मला दिसत आहे. यामुळे प्रश्न सुटणार नाही. भाजपाने आपल्या हरियाणा आणि यूपीच्या सरकारांशी चर्चा करून दिल्लीला महिनाभर पाणी दिले, तर दिल्लीतील लोक भाजपाच्या या पावलाचे खूप कौतुक करतील. एवढी तीव्र उष्णता कोणाच्याही नियंत्रणाबाहेर आहे, पण आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास लोकांना दिलासा मिळू शकतो. (Delhi Govt)

राजधानीत तीव्र पाणीटंचाई असून हरियाणा दिल्लीच्या वाट्याचे पाणी देत नसल्याचा आरोप जलमंत्री आतिशी यांनी केला आहे. (Delhi Govt)

(हेही वाचा – Tadoba तील बघीरा ॲप ठरले कुचकामी; प्रशासनाने आणली नवी यंत्रणा)

भाजपाचा निषेध मोर्चा

दिल्लीतील पाणी संकटाबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी शाहिदी पार्क ते दिल्ली सचिवालय असा निषेध मोर्चा काढला. या वेळी केजरीवाल सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपाच्या नवी दिल्लीतील लोकसभा उमेदवार बांसुरी स्वराजही उपस्थित होत्या. (Delhi Govt)

आप सरकारने कृत्रिम जलसंकट निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्ली जल बोर्डाला २०१३ मध्ये ६०० कोटी रुपयांचा नफा होता. आज ते ७३ हजार कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. याला अरविंद केजरीवाल जबाबदार आहेत, असे आरोप स्वराज यांनी केले आहेत. (Delhi Govt)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.