छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन

58

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे.  लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते शिवनेरी (Shivneri Fort) येथे ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.  (DCM Eknath Shinde)

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले (Fort) त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची (Fort Conservation) कामे करण्यात येत आहे. गड किल्ल्यांवर  येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरीता (Navy) प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

(हेही वाचा – Prayagraj मध्ये उभारणार साहित्य तीर्थक्षेत्र; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये?)

भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाडा, आग्र्याला देखील दिवाण-ए-आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करण्यात येत आहे. महाराजाची वाघनखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.