उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, अजूनही केंद्राकडे जीएसटीचे 15 हजार कोटी बाकी

135

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की राज्याला केंद्राकडून 15 हजार कोटी रुपये मिळणे अजूनही बाकी आहेत. ही रक्कम मिळाल्यास आम्हाला विकास कामासाठी खर्च करता येतील.

महाराष्ट्रासह या राज्यांना जीएसटी परतावा

मार्च 2022 पर्यंत राज्याकडे येणारी जीएसटी रक्कम 29 हजार 600 कोटी रुपये होती. त्यापैकी 14 हजार कोटी रुपये राज्याला दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्याला केंद्राकडून 15 हजार कोटी रुपये मिळणे अजूनही बाकी आहे. ही रक्कम मिळाल्यास आम्हाला विकास कामासाठी खर्च करता येतील, असे त्यांनी म्हटले. आतापर्यंत केंद्र सरकारने एकूण 21 राज्यांना जीएसटी परतावा दिला आहे. यात महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. 21 राज्यांचा मिळून एकूण 86 हजार 912 कोटी रुपयांचा परतावा केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आला आहे.

( हेही वाचा: अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ करा; पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )

राज्यसभा निवडणूकीवर केले भाष्य

भाजपचे दोन उमेदवार, महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक असे 5 उमेदवार निवडून येणार आहेत. आता सहाव्या जागेच चित्र 3 तारखेला स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे असलेला अतिरिक्त मतांचा कोटा हा शिवसेनेला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे  अजित पवारांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.