Aurangzeb : औरंगजेबाचे फोटो अचानक झळकण्याला राजकीय वास; आमदार सत्यजीत तांबे

कोल्हापुरात काही जणांनी औरंगजेबाचा फोटो मोबाईलमध्ये स्टेटस म्हणून ठेवल्यामुळे दंगल झाली, त्यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया दिली.

183

संगमनेरसह कोल्हापूरला झालेला प्रकार निंदनीयच आहे. मात्र, तरुणांचा वापर स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे. औरंगजेबाचे फोटो अचानक झळकण्याला राजकीय वास असून अशा प्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. राजकारण्यांनाच फायदेशीर असतात, हे लक्षात घेऊन युवकांनीच असे प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे मत नाशिक पदवीधर आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

राज्याचे चित्र चिंताजनक असून इथे सर्व जाती धर्माच्या नावावर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. मात्र तरुणांनी आता जागे व्हावे, चांगेल काय, वाईट काय ते बघावे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे. औरंगजेब हा काही आताच लोकांना माहित झालाय का? मग आताच त्याचे फोटो का झळकू लागले आहेत, त्याचा विचारदेखील तरुणाईने करणे आवश्यक असल्याचेही तांबे यांनी नमूद केले. शिक्षण विभागाचा कारभार 20 ते 25 वर्षांपासून चर्चेत आहे. शिक्षक इतर कामात गुंतत चालला आहे. त्यामुळे शैक्षणिक दर्जा सोडून इतर कामात व्यस्त आहेत. शिक्षण आयुक्तांनी शिक्षकांची चौकशी करावी, याबाबत पत्र दिले, ही अवस्था चिंताजनक आहे. शिक्षण-आरोग्य हे देशाचा कणा आहे. यात भ्रष्टाचार नको, तर शासनाने पैसे टाकले पाहिजे असेही तांबे म्हणाले.

(हेही वाचा Love Jihad : जपानमध्ये वाढतेय मुस्लिमांची लोकसंख्या; ‘लव्ह जिहाद’ हे तर कारण नाही ना?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.