आयुक्तांचा दणका; ‘या’ राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांना नोटिसा

181

राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. त्यात यंदा उसाचा गाळप अधिक झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सहकारी साखर कारखाने अधिक महिने चालवले आहेत. काही कारखाने तर एप्रिल महिन्यापर्यंत सुरु होते. हे कारखाने 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे असून, त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे साखर आयुक्तांनी जाहीर केले आहे. या साखर कारखान्यांमध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: सुषमा अंधारे शिवसेनेत आल्याने उजेड पडेल का? )

या कारखान्यांना आयुक्तांचा दणका

  • सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना , पंढरपूर- आरआरसी रक्कम 3674.90 लाख ( राजकीय नेते- कल्याणराव काळे)
  • पुणे- राजगड सहकारी कारखाना लिं.भोर- आरआरसी रक्कम 2591.69 लाख ( राजकीय नेते आमदार संग्राम थोपटे )
  • बीड- आंबेजोगाई सहकारी कारखाना, आंबेजोगाई, – आरआरसी रक्कम 814.15 ( राजकीय नेते धनंजय मुंडे)
  • उस्मानाबाद- जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी- आरआरसी रक्कम- 340.69 लाख ( राजकीय नेते विजयकुमार दांडनाईक)
  • सातारा- किसनवीर ससाका भुईंज, सातारा आरआरसी रक्कम- 411.91 लाख ( आमदार मकरंद पाटील)
  • अहमदनगर- साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर- आरआरसी रक्कम- 2054.50 लाख ( राजकीय नेते आमदार बबनराव पाचपुते )
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.