सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली

187
आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या; Bharat Gogawale यांची उच्च न्यायालयात याचिका

महाराष्ट्रातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास तरी उठली आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे.

महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ जणांची नावे पाठवली होती. पण कोश्यारी यांनी त्यांना मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नवी यादी राज्यपालांना पाठवली होती. पण जुनी यादी रद्द करून नव्या यादीला मंजूर देण्याच्या मुद्यावर एका याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे.

(हेही वाचा – Foxconn Vedanta Deal : फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला)

सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने या आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती.

मुंबई हायकोर्टात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जनहित याचिका करणारे नाशिकमधील रतन सोली लुथ यांनी हायकोर्टाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. त्या अपिलावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. यावर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना आपली याचिका परत घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.