- सुजित महामुलकर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स जवळपास संपला आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपाला (BJP) राज्यात सरकार स्थापन करण्यास समर्थन देण्यात आले.
(हेही वाचा – Shaktikanta Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ?)
राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा जाहीर
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बुधावारी पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या (BJP) मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला असून येत्या एक-दोन दिवसात शिवसेना पक्षाकडून भाजपाला समर्थन असल्याचे पत्र देण्यात येईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देणात आली. याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन भाजपाच्या (BJP) मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला पाठींबा असल्याचे सांगितल्याचे समजते.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी?)
वादावर पडदा
विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर गेले चार दिवस विरोधी पक्षाकडून आणि माध्यमांमध्ये महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होत असल्याच्या बातम्या पेरल्या जात होत्या. बुधवारी शिंदे यांनी स्पष्टपणे भाजपाला (BJP) आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आणि वादावर पडदा टाकला. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि पक्षाचे समर्थन दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community