तालिबानी म्हणतायेत लोकशाही टाकाऊ, शरिया कायद्यानेच सत्ता राबवू! 

अफगाणिस्तानात महिलांना किती अधिकार द्यायचे, हे शरिया कायद्यानुसार ठरवले जाईल, त्याचा अधिकार मुस्लिम धर्म नेत्यांना दिले जातील, ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे महिलांचे अभितव्य ठरेल, असे तालिबान्यांचा नेता वाहिदुल्ला हाशमी म्हणाला. 

123

२००१ साली अमेरिकेने अफगाणिस्तानातून तालिबानी दहशतवाद्यांची राजवट उलथवून टाकली आणि लोकशाही मार्गाने नवीन राजवट आणली, मात्र २० वर्षांनी त्याच अमेरिकेने तालिबान्यांना कंटाळून तेथून पळ काढला. आज अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानी राजवट आली आहे. आता तालिबानी अफगाणिस्तानवर कशाप्रकारे राज्य करायचे, याचा विचार करत आहेत. तालिबान्यांचा प्रमुख हिब्तुल्लाह अखुंदझादा याचा विश्वासू सहकारी वाहिदुल्ला हाशमी याने यासंबंधी बोलताना ‘लोकशाही ही आमच्यासाठी टाकाऊ आहे, अफगाणिस्तानात शरिया कायद्यानेच सत्ता राबवू’, असे म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना वाहिदुल्ला हाशमी बोलत होता.

अशी असेल तालिबानी राजवट! 

वाहिदुल्ला हाशमी याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानात सत्तारूढ परिषदेच्या माध्यमातून सत्ता राबवली जाईल. यामध्ये वाहिदुल्ला हाशमी हा या परिषदेत पहिल्या फळीचा नेता असणार आहे. या परिषदेचा अध्यक्ष हा तालिबान्यांचा प्रमुख हिब्तुल्लाह अखुंदझादा हा असणार आहे. तर मौलवी ओमर याचा मुलगा मावलवी याकूब, ‘हक्काणी’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सरजुद्दीन हक्कानी आणि तालिबानी यांचा राजकीय सल्लागार अब्दुल घनी बरदार हेही यात असणार आहेत. मात्र अद्याप चित्र स्पष्ट व्हायचे आहे, असे हाशमी म्हणाला.

(हेही वाचा : पुन्हा होणार ‘२६/११’? गुप्तचर संघटनेच्या माजी अधिकाऱ्याने दिला धोक्याचा इशारा)

महिलांचे अधिकार धार्मिक नेते ठरवतील! 

अफगाणिस्तानात महिलांना किती अधिकार द्यायचे, हे शरिया कायद्यानुसार ठरवले जाईल, त्याचा अधिकार मुस्लिम धर्म नेत्यांना दिले जातील, ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे महिलांचे अभितव्य ठरेल, असेही हाशमी म्हणाला.

वौमानिकांना परत बोलावले! 

अफगाणिस्तानचे सैन्य सर्व शस्त्रास्त्रे सोडून पळून गेले. त्याचा ताबा आम्ही घेतला आहे. आमच्याकडे आता २२ लढाऊ विमाने आहेत, २४ हेलिकॉप्टर आहेत. मात्र आमच्याकडे वैमानिक नाहीत. आम्ही मागील २० वर्षांत अफगाणी सैन्य बरेच ठार केले आहे. पळून गेलेल्या सैन्यामधील वैमानिकांशी आम्ही संपर्क करत आहोत, त्यांनी तालिबानी राजवटीत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत, त्यांना टर्की, अमेरिका जर्मनी येथून प्रशिक्षण देण्यात आले आहे, आम्ही आमचे नवीन सैन्य दल उभारणार आहोत, असेही हाशमी म्हणाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.