महाराष्ट्रात मुघल आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली. हिंदूंच्या संस्कृतीवर हल्ला केला. आज जे उत्तर प्रदेशातील ज्ञानव्यापी मंदिराचा विषय देशभरात चर्चेला आला, तेथील महादेवाचे मंदिर तोडून त्यावर औरंगजेबाने मशीद बांधली. आज तीनशे वर्षांनी हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे आणि या ठिकाणचे खोदकाम सुरु झाले आहे. त्या खोदकामातून शिवलिंग, हिंदू धर्मातील प्रतिके समोर आली आहे. यावरून मुघल आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली असल्याचा पुरावा मिळत आहे. असाच प्रयत्न महाराष्ट्रातही झाला होता. त्यामध्ये आज अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते ते पंढरपूचे श्री विठ्ठल मंदिरही सुटले नव्हते.
पंढरपूर मंदिरातून श्री विठ्ठलाची मूर्ती हलवलेली
शिवकाळात मुघलांनी जसा देशभर धुडगूस घातला होता, तसा आज महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, त्या प्रांतातही घातला होता. मुघलांनी तसा हल्ला महाराष्ट्रातही केला होता. महाराष्ट्रातील हिंदूंची शेकडो मंदिरे मुघल आक्रमकांनी उद्ध्वस्त केली होती. त्याप्रमाणे मुघलांनी पंढरपूच्या श्री विठ्ठल मंदिरावरही हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा पंढरपुरातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन सल्लामसलत करून मंदिरातील श्री विठ्ठलाची मूर्ती मूळ गाभाऱ्यातून जवळच्या देगावचे सूर्याजी पाटील यांच्या शेतातील चिरेबंदी विहिरीत ठेवली आणि मंदिरात दुसरी मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यानंतर पाटील परिवाराने ती मूर्ती शेकडो वर्षे जतन केली. या विहिरीला राजेशाही पायऱ्या आहे. चिरेबंदी कमान आहे. ही मूर्ती परत करताना सूर्याजी पाटील यांच्या घराण्यातील वंशजांनी पंढरपुरातील १२ बलुतेदारांना एकत्र बोलावून त्यांच्यासमोर ‘मूर्ती मिळाली’, असे लेखी लिहून द्यावे, अशी अट घातली. त्याप्रमाणे तेथील श्री विठ्ठल मंदिरातील बडव्यांनी ताम्रपट लिहून दिले. या ताम्रपटाचा दस्तऐवज पुणे संशोधन केंद्रात आजही आहे. यानिमित्ताने या मूर्तीचा ‘संरक्षण दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो.
(हेही वाचा ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचा ‘तो’ व्हिडिओ ठरणार महत्त्वाचा पुरावा!)
Join Our WhatsApp Community