ठाकरे सरकारचा 3 जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा?

142

2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचे घोटाळे उघड करुन, त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी 2022 च्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारचे कोविड सेंटरमधील घोटाळे येत्या 10 दिवसांत बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. आता त्यात आणखी भर टाकत पुण्यात बोलताना, त्यांनी ठाकरे सरकारने 3 जब्मो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा केलेला घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले. तसेच, हे कोविड सेंटर बनवण्यासाठी ठाकरे सरकारने ठराविक कंपन्यांना काम देण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला 

उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. 9 दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात 7 कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. 65 कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

( हेही वाचा :भाजपच्या 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, बघा… कोणाचा असणार सहभाग )

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

ज्या कंपनीने लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप केले. त्यांच्या विरोधात सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. 100 कोटी कमावण्यासाठी रस्त्यावरच्या एका माणसाला हे काम दिलं गेलं. यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. तसेच दोन दिवसांत राज्यपालांकडून सर्व कागदपत्रे देणार असल्याचही त्यांनी सांगितलं. हे प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रयत्न सुरु आहे. कोविड सेंटरमध्ये अनेकांचे मृत्यू झाले, हे मृत्यू नाही तर हत्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निर्दोष नागरिकांच्या हत्या झाल्या, अशा शब्दांत सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर हल्ला चढवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.