२०२० मध्ये कोसळणारे राज्यातील Uddhav Thackeray सरकार मोदींनी का वाचवले?

208
२०२० मध्ये कोसळणारे राज्यातील Uddhav Thackeray सरकार मोदींनी का वाचवले?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यातच म्हणजे एप्रिल २०२० मध्येच ठाकरे सरकार कोसळले असते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी केली आणि सरकार बचावले. (Uddhav Thackeray)

याबाबतचा गौप्यस्फोट ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ या यु-ट्यूब चॅनलवर सोमवारी २३ ऑगस्टला केला. (Uddhav Thackeray)

विधान परिषद निवडणूक रद्द

तोरसेकर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपासोबत विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीला घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर त्यांना पुढील सहा महिन्यात विधिमंडळ सदस्य म्हणून शपथ घेणे आवश्यक होते. मात्र, कोरोना महामारीमुळे २४ मार्च २०२० मध्ये देशभर लॉकडाउन लागला आणि पूर्ण देश ठप्प झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाने देशभरातील राज्यसभा, विधान परिषद तसेच पोटनिवडणुकासह एप्रिल २०२० मध्ये होणारी राज्यातील विधान परिषद निवडणूकही रद्द केली. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Union Budget 2024 : केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा; विजय वडेट्टीवार यांची टीका)

मोदींची मध्यस्थी

ठाकरे यांचं दुर्दैव असं की, त्यावेळी निवडणूक आयुक्तदेखील अमेरिकेत अडकले होते. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ (नोव्हेंबर २०१९) घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य होणे गरजेचे होते. ठाकरे विधान परिषद सदस्य होऊ शकले नसते तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असता आणि ‘मविआ’ सरकार कोसळले असते. पण तसा प्रसंग उद्धव ठाकरे ज्यांना कट्टर शत्रू मानतात त्या नरेंद्र मोदी यांनी येऊ दिला नाही, असे भाऊ तोरसेकर यांनी उघड केले. (Uddhav Thackeray)

.. आणि ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद आणि सरकार वाचले

उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना फोन करून सांगितले की, आमदार म्हणून निवडून आलो नाही तर राजीनामा द्यावा लागेल आणि महाविकास आघाडी सरकार कोसळेल. तेव्हा मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये अडकलेले निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना फोन करून ही निवडणूक घेण्याची विनंती केली. मग राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून घटनात्मक पेच निर्माण झाल्याचे कळवले, अशी माहिती तोरसेकर यांनी दिली. त्यामुळे मोदी यांच्या मध्यस्थीने ही निवडणूक झाली आणि ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद आणि पर्यायाने सरकार वाचले. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.