Congress : कॉंग्रेसला धोका मोदींचा नव्हे तर स्थानिक पक्षांचा

220
Congress : उत्तर प्रदेशात काॅंग्रेस राम भरोसे
Congress : उत्तर प्रदेशात काॅंग्रेस राम भरोसे
मोदींना विरोध करण्यासाठी पटणामध्ये १५ विरोक्षी पक्षाचे सर्वोच्च नेते एकत्र जमले होते. मोदी सरकारला विरोध करण्यासाठी व २०२४ ला मोदींचा पराभव करण्यासाठी ते एकत्र आले आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना याचसाठी झाली होती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हा एकमेव हेतू असल्यामुळे हॉंग्रेसने दोन पावले मागे जायचं ठरवलं.
आता कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये विजय मिळवला असून बड्या भाजपचा एकट्याने पराभव केला आहे. याचे श्रेय कॉंग्रेसने स्थानिक नेत्यांना न देता राहुल गांधींना दिले ही मजेशीर बाब आहे.  पटणामध्ये झालेल्या बैठकीत कॉंग्रेसने लवचिकता दाखवावी यावर चर्चा झाली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी समान विचारधारा असणार्‍या पक्षांशी आघाडी करण्यासाठी आपण तयार आहोत असे सांगितले. तसेच कॉंग्रेसचे कायमस्वरुपी युवराज राहुल गांधी यांनी पूर्वग्रह विसरुन आपण लवचिकता पाळणार असल्याचे म्हटले आहे.
आता मूळ मुद्द्याकडे येऊ. कॉंग्रेसने लवचिकता दाखवावी म्हणजे काय करावे? तर अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्षांना कॉंग्रेसपेक्षा चांगली मते मिळाली आहेत, तर त्या जागा कॉंग्रेसने स्थानिक पक्षांसाठी राखीव ठेवाव्यात. हीच कॉंग्रेससाठी मोठी अडचण आहे. भाजपाला हरवण्यासाठी कॉंग्रेस महाराष्ट्रात दोन पावले मागे आली होती. आता मात्र देशातही हाच फॉर्म्युला अंमलात आणायचा तर कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्यात येईल.
कॉंग्रेसला ४०० पेक्षा कमी जागा लढवाव्या लागतील, ज्यामुळे मुख्य पक्ष म्हणून त्यांचे महत्व कमी होऊ शकते. त्यांना २०१४ ला ४४ तर २०१९ मध्ये ५२ जागा मिळाल्या होत्या. आता जर कॉंग्रेसला केवळ ४० च्या आसपास जागा मिळवत्या आल्या आणि स्थानिक पक्षांनी मिळून त्यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या तर कॉंग्रेस हा पर्यायाने लहान पक्ष ठरेल. त्यांचा उर्वरित राष्ट्रीय दर्जा संपुष्टात येईल. मोदींना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस माघार घेईल का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
राहुल गांधी लवचिकता दाखवण्याची भाषा करत असले तरी ही लवचिकता त्यांना राष्ट्रीय नेता राहण्यास संमती देत नाही. या लढाईत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवालांसारखे भाजपाचा सामना करणारे किंवा भाजपला त्या त्या राज्यात रोखून धरणारे दिग्गज विरोधक देखील आहेत. या सर्वांमध्ये राहुल गांधी कुठे बसतात? त्यामुळे मोदींना हरवण्यासाठी कॉंग्रेसला मोठा त्याग करावा लागेल आणि हा त्यागामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो.
– जयेश मेस्त्री
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.