राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतानंतर आता केंद्रीय बोर्डाच्या राज्यातील शाळांतही ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Majha) हे राज्यगीत (National Anthem) नियमित गायन करणे अनिवार्य करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले.
हेही वाचा- CM Devendra Fadnavis साहेब, महापालिकेच्या सुमारे १० हजार कोटींच्या थकीत रकमेचे काय करता?
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असून राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले जाईल, असा निर्णय शिक्षण विभाग घेणार असून लवकरच याची अंमलबजावणी होईल.(Dada Bhuse)
राज्यगीतामुळे महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक महती शालेय वयापासून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली जावी. त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक सर्व मंडळाच्या शाळेत राज्य गीताचे नियमित गायन झाले पाहिजे, असे आग्रही मत दादां भुसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- Shirdi Water Park : शिर्डी वॉटर पार्क आता इमॅजिकाच्या ताब्यात, काय आहेत या पार्कची वैशिष्ट्ये
राज्यातील सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) आणि आयबी (IB) वगैरे सर्व बोडांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत दर दिवशी शाळा भरण्याआधी वाजवावे, असा निर्णय जारी केला जाईल आणि त्याची ठोस अंमलबजावणी करण्याच्याही सूचना शाळांना दिल्या जातील, असेही शालेय शिक्षणमंत्री म्हणाले. (Dada Bhuse)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community