दापोलीतील त्या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नसून किरीट सोमय्या जाणीवपूर्वक माझा संबंध त्याच्याशी जोडून माझी प्रतिम मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी ते कागदोपत्री सिध्द करावे असे सांगत परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी याविरोधात आपण पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका करणार असल्याचे सांगितले.
( हेही वाचा : सोमय्यांनी आता मुख्यमंत्र्यांनाही दिले हे आव्हान )
कागदोपत्री सिध्द करून दाखवा
दापोलीतील अनधिकृत रिसॉर्टप्रकरणी कारवाई करण्याची आठवण करून देण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या शनिवारी दाखल झाले होते. याप्रसंगी बोलतांना त्यांनी परब यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही जोरदार टिका करत त्यांना आव्हान दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी, हा रिसॉर्ट आपला नसल्याचे सांगितले. याबाबतची कागदपत्रे तपासली गेली आहे. वेगवेगळ्या एजन्सीनेही ती तपासली आहेत. त्यात माझा कुठेही संबंध आढळून आला नाही. जर किरीट सोमय्यांना हे वाटत असेल तर त्यांनी ते कागदोपत्री सिध्द करून दाखवा, असेही आव्हान दिले आहे. किरीट सोमय्या हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आहेत का? त्यांना कारवाईचे अधिकार कोणी दिले? जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते तोडून दाखवावे असे सांगत सोमय्या हे कोकणातील वातावरण खराब करत आहेत. यामुळे सर्वच रिसॉर्टला नोटस देण्यात आल्याने तेही भयभीत आहे. त्यामुळे तेथील रिसॉर्ट चालक, मालकांनी आंदोलन केले. त्यामुळे कोकणातील पर्यटनावरील होणाऱ्या परिणामामुळे पालकमंत्री म्हणून मी त्यांच्या पाठिशी उभा राहिलो असल्याचेही परब यांनी सांगितले.
प्रतिम मलिन करण्याचा प्रयत्न
या रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात सोमय्यांनी संबंधित एजन्सीला विचारावे ना? त्यावर कारवाई करणारे ते कोण? त्यामुळे ते केवळ नौटंकी करत आहे. हे रिसॉर्ट सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन बांधले आहे. आपली प्रतिम मलिन करण्याचा हा प्रयत्न असून याविरोधात आपण न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे सांगत उच्च न्यायालयात पुढील आठवड्यात याचिका दाखल केली जाणार असल्याचे अनिल परबांनी सांगितले.
कोकणात सुमारे १५० ते २०० रिसॉर्ट आहेत. मुंबईतही अशी अनधिकृत बांधकाम आहे. कुणाचे पाण्यात बंगले आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करायला करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community