मुंबई महानगरपालिका Uddhav Thackeray यांच्या हातातून जाणार? काय आहे कारण जाणून घ्या!

90
मुंबई महानगरपालिका Uddhav Thackeray यांच्या हातातून जाणार? काय आहे कारण जाणून घ्या!
  • प्रतिनिधी

मुंबईत उबाठा शिवसेनेचा दबदबा कमी झाल्याचे मुंबईकरांनी यावेळी मतपेटीतून दाखवून दिले आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीला २२, तर महाविकास आघाडीला १४ जागा मिळाल्या आहेत. लोकसभेत मुंबईत तब्बल २२ विधानसभा जागांवर आघाडी पुढे होती. परंतु सहा महिन्यांत पिछाडी भरून काढत, उबाठाला १० जागांवर रोखण्यात महायुतीला यश आले. महाविकास आघाडीसाठी त्याहीपेक्षा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उबाठासाठी मुंबई महानगरपालिका जिंकून येणं अत्यंत अवघड झाले आहे.

मुंबईत उबाठाने या वेळी २४ जागा लढवल्या, तर काँग्रेसला ११, सपासाठी एक जागा सोडली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात पक्षसंघटना कमजोर झाली, मात्र मुंबईत काही नेते पक्ष सोडून गेले तरीही संघटना, शाखांचे नेटवर्क टिकून होते. मुख्यमंत्री पद, पक्ष, निवडणूक चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत मुंबईत चारपैकी तीन जागा जिंकून दमदार यश मिळवले, मात्र केवळ सहा महिन्यांत आलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हे यश टिकवता आले नाही व महायुतीला केवळ १४ जागा मिळाल्या. त्यात उबाठाला केवळ १० जागा मिळाल्या. उबाठा शिवसेनेची मुंबईतली आतापर्यंतची ही सर्वांत वाईट कामगिरी आहे.

(हेही वाचा – Assembly Election मध्ये ३ आमदार आठव्यांदा तर ५ आमदार सातव्यांदा विजयी; थोरातांच्या नऊ वेळा आमदार होण्याच्या रेकॉर्डला ब्रेक)

या निकालामुळे मुंबईचा आवाज कुणाचा, याचे उत्तर स्पष्ट मिळाले नाही. मुंबईसह राज्यात झालेल्या दारूण पराभवामुळे पक्षसंघटना कमजोर होईल. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाची गळती थांबली होती. या पराभवामुळे ही गळती अजून वाढण्याची भीती आहे. संभ्याव्य पक्ष गळती थांबवून संघटनेत नवी ऊर्जा भरून, पक्षाला पालिका निवडणुकीसाठी तयार करण्याचे कठीण आव्हान मातोश्रीपुढे असणार आहे. मराठी मतदारांना आपल्याकडे वळवणे, शिवसेना-भाजपाचा प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मोडून काढण्याचे आव्हानही ठाकरे यांच्यापुढे आहे.

काँग्रेस पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये ११ जागा लढवल्या व त्यातील जेमतेम तीन जागा निवडून आणण्यात काँग्रेसला यश मिळाले. मुंबईमध्ये दलित, मुस्लिम तसेच परप्रांतीय मतदारांमध्ये आपली पकड ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे मताधिक्य देखील घटताना दिसून आले आहे. यामुळे काँग्रेस पक्षाचे मुंबईत असलेले अस्तित्व आता कमी होताना दिसून येत आहे. याबरोबरच पक्षात असलेल्या नेत्यांमधील दुफळी देखील पहावयास मिळते. याचाच परिणाम यंदाच्या निवडणुकीत बघायला मिळाला आहे. महाविकास आघाडी म्हणून उबाठाची मते काँग्रेसला मिळाली नाही असा आरोप देखील काँग्रेसच्या नेत्यांकडून दबक्या आवाजात बोलून दाखवला जात आहे.

(हेही वाचा – RTO मालामाल! प्रचारातील वाहनांतून लाखोंचा महसूल)

मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीला २२ जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. यापैकी एकट्या भाजपाने १५ जागा जिंकून मुंबईमध्ये उत्तर भारतीय, गुजराती, मराठी व दलित हा भाजपाला मानणारा वर्ग मोठा असल्याचे सिद्ध केले आहे. मागच्या वेळेस झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मिळवलेले यश हे एकसंघ शिवसेनेच्या जवळपास असताना देखील महायुतीत वाद नको म्हणून महापालिकेत आपला महापौर बसवला नव्हता हे देखील सर्वांना माहित आहे.

मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेने १६ जागा लढवल्या होत्या परंतु त्यातील अवघ्या सहा जागा त्यांना जिंकता आल्या. ठाण्याप्रमाणे शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईमध्ये तेवढेसे वलय नसल्याचे या निकालातून पहावयास मिळाले आहे. परंतु तरीदेखील मिळालेले यश हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे की मुंबईमध्ये आम्हाला विजय मिळू शकतो. याचाच फायदा भाजपाला महायुती म्हणून लढताना मुंबईमध्ये होऊ शकतो. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना भाजपासोबत महायुतीत लढल्यास महायुतीला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

(हेही वाचा – हिंदूंनी जात-पात, संप्रदायांच्या वर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी; Govinddev Giri महाराज यांचे आवाहन)

विधानसभा निवडणुकीमध्ये विशेषत: मुंबईत मनसेला भोपळा देखील फोडता आला नाही. मनसेच्या उमेदवारांमुळे मत विभाजन नक्कीच झाले. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या उबाठाला झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा करिष्मा स्वतःच्या मुलाला अमित ठाकरे यांना देखील विजयी करू शकला नाही. वारंवार बदलत असलेली भूमिका, इतर पक्षांबरोबर केलेली छुपी युती अशा अनेक कारणांमुळे मतदारांनी राज ठाकरे यांच्यावरती देखील विश्वास दाखवला नाही. असे सर्व असले तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विशेषत: मुंबईत ज्या प्रकारचे मत विभाजन झाले याचा फटका येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उबाठाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. हिंदुत्वापासून घेतलेली फारकत उद्धव ठाकरे यांना अडचणींची ठरू शकते असे जाणकार मानतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.