Vanchit Bahujan Aghadi : आधी तुमचं ठरवा, मग बोला; वंचितने उबाठाला सुनावले

वंचित आघाडी आणि उबाठा यांची गुरुवारी बैठक झाली. बैठक लोकसभेच्या जागावाटपासाठी होती मात्र अद्याप उबाठाला त्यांच्या वाट्याला किती जागा मिळणार याची स्पष्ट माहिती नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

239
Vanchit Bahujan Aghadi : आधी तुमचं ठरवा, मग बोला; वंचितने उबाठाला सुनावले
Vanchit Bahujan Aghadi : आधी तुमचं ठरवा, मग बोला; वंचितने उबाठाला सुनावले

“आधी तुमचं आपापसात ठरवा मग आमच्याशी बोला,” अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उबाठाला सुनावले.

वंचित आघाडी आणि उबाठा (UBT) यांची गुरुवारी बैठक झाली. बैठक लोकसभेच्या जागावाटपासाठी होती मात्र अद्याप उबाठाला त्यांच्या वाट्याला किती जागा मिळणार याची स्पष्ट माहिती नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

..तर उबाठाशी चर्चा

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे (Sidhharth Mokale) यांनी थेट उबाठावर निशाणा साधत आधी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP) आणि उबाठा या तीन पक्षांनी राज्यातील लोकसभा जागांचे आपापसात वाटप करावे, मगच उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये जागावाटपाची चर्चा करता येईल, असे सांगितले.

(हेही वाचा – Shri Ram Mandir : अयोध्येत बाळासाहेब ठाकरेंचाही सन्मान व्हावा याकरता मनसेने केली ‘ही’ मागणी )

वंचित अद्याप महाविकास आघाडीत नाही

ते पुढे म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) अद्याप महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) किंवा इंडी आघाडीमध्ये (I.N.D.I. Alliance) आमंत्रित करण्यात आलेले नाही. मात्र शिवसेना पक्ष (उबाठा) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटक पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये जोवर महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचे आपापसात जागावाटप होत नाही तोवर शिवसेनेच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा आल्या हे स्पष्ट होणार नाही. आणि हे स्पष्ट होत नाही तोवर आम्हाला शिवसेनेबरोबर जागा वाटप करता येणार नाही अशी अडचण आहे. आम्हाला इंडी मध्ये आमंत्रित करीत नसले तरी किमान महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापसात जागावाटप करावी, जेणे करून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेला आपसात जागावाटप करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भूमिका आम्ही अनेकदा मांडली आहे. मात्र, अद्याप या तीन पक्षात जागावाटपाची बोलणी झाली नसल्याचे समोर आले आहे,” असे मोकले यांनी स्पष्ट केले.

उबाठाचे घुमजाव

दरम्यान, उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसशी बोलणी झाली असून उबाठा २३ जागा लढणार असे याआधी जाहीर केले होते. यावर घुमजाव करत राऊत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले उबाठाची काँग्रेसशी प्राथमिक बोलणी सुरु होणार असून २-३ दिवसात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अन्य काही नेते दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.