राज्यातील Opposition Party चे अस्तित्वच धोक्यात!

54
राज्यातील Opposition Party चे अस्तित्वच धोक्यात!
राज्यातील Opposition Party चे अस्तित्वच धोक्यात!
  • सुजित महामुलकर

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या धक्क्यातून विरोधी पक्ष (Opposition Party) अद्याप सावरलेला दिसत नाही. फडणवीस सरकार स्थापन झाले आणि पहिले हिवाळी अधिवेशन गेल्या सोमवारी १६ डिसेंबर २०२४ पासून नागपूरला सुरू झाले. नागपूरच्या थंडीत विरोधी पक्षही गारठल्याचे चित्र विधिमंडळात दिसत होते. एकूणच कॉँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे समन्वयाचा अभाव, एकमेकांबाबत असुरक्षिततेची भावना, आपापसात कुरघोडीचे प्रयत्न, एकमेकांच्या भूमिकेबाबत साशंकता या कारणांनी ग्रासले असून याच अधिवेशनात पुढील पाच वर्षे विरोधी पक्ष (Opposition Party) काय करणार? याचा ट्रेलरच दाखवला. इतक्या कमकूवत विरोधी पक्षांमुळे (Opposition Party) सत्ताधारी तीन पक्षांत अधिकारावरून आपापसात भांडणे सुरू होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, हेही तितकेच खरे.

सत्ताधारीही अस्वस्थ

विधानसभा निकाल लागला आणि प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीला सरकार स्थापन करण्यास तब्बल १३ दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात काही दिवस विलंब आणि त्यानंतर खातेवाटपाविना अधिवेशनातील ४२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ. बहुदा सत्ताधारी पक्षांना इतके प्रचंड बहुमत मिळाले की त्यांच्यात सरकार स्थापन करण्यापासूनच अस्वस्थता, अंतर्गत वाद आणि रूसवाफुगवीचा जन्म झाल्याचे दिसून आले. बहुमत एका मर्यादेत मिळाले असते तर कदाचित समंजस्याने सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले असते, असे म्हणायला जागा आहे. प्रत्येक निर्णयात समंजस्याचा अभाव स्पष्टपणे दिसत होता. अगदी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहणापासून ते मंत्रिमंडळ विस्तार आणि पुढे खातेवाटप.

(हेही वाचा – Kanpur मध्ये बंद असलेली १२० मंदिरे आढळली; काही मंदिरात आता बिर्याणीचे दुकान तर…)

काँग्रेस आणि शिवसेना उबाठात लपंडाव

सत्ताधारी पक्षांमध्ये अखेर उशिरा का होईना, एकमताने निर्णय होताना दिसले. विरोधी पक्ष मात्र निवडणूक निकाल लागून महिना उलटला तरी त्या धक्क्यातून बाहेर आलेले पाहावयास मिळत नाही. गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात समन्वयच नसल्याचे दिसून आले आहे. जेमतेम सहा दिवसांच्या अधिवेशनात तीन दिवस तर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात सभागृहात उपस्थितीवरून लपंडाव सुरू असल्याचे जाणवले. कधी उबाठाचे सदस्य सभागृहात दिसत असताना काँग्रेस सदस्य बहिष्काराच्या भूमिकेत होते तर कधी काँग्रेसची उपस्थिती आणि उबाठा सभागृहाबाहेर.
राष्ट्रवादी ‘शप’कडून फडणवीस

यांच्यावर स्तुतिसुमने

मुख्यमंत्री पदाचा निर्णय, मंत्रिमंडळ विस्तारासाठी होणारा विलंब, खातेवाटपाला उशीर या मुद्यांवर भाजपावर टीका करणाऱ्या काँग्रेसने अद्याप विधानसभा गटनेता, विधिमंडळ नेता निवडला नाही. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनेही विधिमंडळ नेत्याची निवड राखून ठेवली होती. मुंबईत झालेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात शरद पवार राष्ट्रवादी गटाने भाजपा आणि फडणवीस यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने आणि शिवसेना उबाठाने हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे परत वळण्याचे दिलेले संकेत यामुळे महायुतीत संभ्रमाचे वातावरण आहे.

(हेही वाचा – काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना केली; Eknath Shinde यांनी विधान परिषदेत दिले लेखी दाखले)

ठाकरे-पवार यांच्या भूमिकेमुळे संभ्रम

हे कमी की काय म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करता करता, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची विधिमंडळात भेट घेऊन २० मिनिटे चर्चा केली आणि या भेटीचे अगदी हास्यविनोद सुरू असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. तर दुसऱ्याच दिवशी शरद पवार (Sharad Pawar) यांनी नवी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आणि जवळपास अर्धा तास उभयतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

गुपिते कालांतराने उघड होतीलच

ही भेट सातारा जिल्ह्यातील फलटणच्या नव्या वाणाच्या डाळींबाचे उत्पादन देण्यासाठी घेतली असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगत या भेटीत राजकीय किंवा साहित्य संमेलनाचा विषय चर्चेला नव्हता, असे स्पष्टीकरण दिले. पवारांच्या या स्पष्टीकरणावर मराठी माणूस किती विश्वास ठेवेल, हे वेगळे सांगायला नको. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) निवडणूक निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर राजकीय वगळता वैयक्तिक टीका-टिप्पणी करणे टाळू लागले आहेत, हेही स्पष्ट दिसते. त्यात दहा दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अमित शाह स्वतः पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नवी दिल्लीतील त्यांच्या घरी पोहोचले.

या उघडपणे होणाऱ्या घटना वगळता गुप्तपणे होणाऱ्या भेटीगाठी, संदेशवहन होत असेल तर ते कालांतराने घटना घडून गेल्यानंतर उघड होतीलच. पण या घटनांच्या तारा एकमेकांशी जोडल्या गेल्या तर दिल्लीत तसेच शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि उद्धव ठाकरे यांचा उबाठा गट यांची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, या विषयावर नागपूरच्या थंड वातावरणात गरमागरम चर्चा ऐकू येत होती. आता लगेच नाही पण काही दिवसांत यांचा उलगडा होईलच. एकूणच विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी पुढे किती काळ एकसंघ राहील याबाबत पवार आणि ठाकरे यांच्या आमदार-खासदारांनाही ठामपणे सांगणे कठीण झाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.