New Parliament Building : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या संसद भवनाच्या इमारतीवर उपराष्ट्रपतींनी फडकवला तिरंगा

मे २८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले होते.

157
New Parliament Building : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या संसद भवनाच्या इमारतीवर उपराष्ट्रपतींनी फडकवला तिरंगा

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी (New Parliament Building) नवीन संसद भवनाच्या ‘गज द्वार’ येथे राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह विविध पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार, विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते. मात्र कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या (New Parliament Building) एक दिवस आधी हा ध्वजारोहणाचा विशेष कार्यक्रम झाला. या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात हलवले जाणार आहे. त्यामुळे नव्या संसद भवनाच्या इमारतीवर आज ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, आज दुपारी साडेचार वाजता नवीन संसद भवनात सर्वपक्षीय बैठक देखील होणार आहे. या बैठकीमधून विशेष अधिवेशन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परस्पर सहमती साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

(हेही वाचा – LCA Mark 1A : वायूदल खरेदी करणार ‘एलसीए-मार्क 1-ए’ लढाऊ विमाने)

उद्यापासून (सोमवार १८ सप्टेंबर) संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन (New Parliament Building) सुरू होत आहे. मे २८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समारंभाचे आयोजन करून नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले होते, परंतु आजपर्यंत नवीन संसद भवनात एकही अधिवेशन झालेले नाही.

संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार

सोमवारपासून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर (New Parliament Building) संसद भवनात सर्वपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीत संसदेत करावयाच्या कामाची रूपरेषा ठरविण्यात येणार असून सरकार विरोधी पक्षांना सहकार्याचे आवाहन करणार आहे.

‘या’ मंत्र्यांना मिळणार नवीन संसद भवनात खोल्या

नवीन संसद भवनात (New Parliament Building) कॅबिनेट मंत्र्यांसाठी खोल्या देण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मुंडा, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अश्विनी वैष्णव आणि स्मृती इराणी यांच्या खोल्या आहेत. त्या खोल्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे जुन्या संसद भवनात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांच्या खोल्या तळमजल्यावर होत्या, मात्र नवीन संसद भवनात त्यांच्या खोल्या किंवा कार्यालये पहिल्या मजल्यावर देण्यात आली आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.