-
खास प्रतिनिधी
वक्फ दुरुस्ती विधेयक गुरुवारी रात्री राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर झाले. मात्र, यावेळी मतदानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हेच गैरहजर राहिल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यात भर म्हणून लोकसभेतही राष्ट्रवादीचे (शप) दोन खासदार अनुपस्थित राहिल्याने संभ्रमाचे रूपांतर संशयात होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
(हेही वाचा – Drunk Driver : मद्यपी वाहन चालकांवर आता थेट गुन्हे दाखल होणार; मुंबई वाहतूक विभागाचा निर्णय)
कोणते खासदार गैरहजर?
शिवसेना उबाठाने वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केले मात्र उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ३ एप्रिल २०२५ या दिवशी पत्रकार परिषद घेत विधेयकाला विरोध नाही तर भाजपाच्या ढोंगीपणाला आहे, असे जाहीर सांगितले. तर शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी पक्षही या विधेयकावरून संभ्रमित आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील मतदानादरम्यान शरद पवार राज्यसभेत गैरहजर राहिले तर त्यांच्या पक्षाचे दोन खासदार, अमोल कोल्हे आणि सुरेश उर्फ बाळयामामा म्हात्रे, लोकसभेत अनुपस्थित होते. एका महत्त्वाच्या विधेयकाच्या मंजुरीदरम्यान शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे खासदार अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत निश्चितच संशयाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
(हेही वाचा – IPL 2025, Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये यशस्वी गोलंदाजांच्या मांदियाळीत दाखल)
ते खासदार वक्फ ‘जेपीसी’ सदस्य
शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ या दिवशी सकाळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले, पवार यांची तब्बेत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. तर शरद पवार यांचे लोकसभेतील दोन खासदारही गैरहजर होते, याबाबत छेडले असता राऊत चिडले आणि ‘हा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे’, असे उत्तर त्यांनी दिले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी (शप) खासदार सुरेश म्हात्रे हे वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) सदस्य होते आणि ते बहुतांश बैठकांना हजर राहिले नाहीत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community