वक्फ बोर्डावर छापेमारी! काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणा-या वक्फ बोर्डावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या संबंधित पुणे येथे ईडीकडून चौकशी केली गेली आहे. तीन नोव्हेंबरला तक्रारदाराने तक्रार नोंदवली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यासंबंधी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. यावर नवाब मलिकांनी स्पष्टीकरण देत, अशी कोणतीही कारवाई केली गेली नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे, असे म्हटले आहे.

माझा लढा अन्यायाविरुद्ध आहे

अशा कारवाईमुळे नवाब मलिक घाबरतील, असे काही लोकांना वाटते. ईडीच्या या कारवाईत महाराष्ट्र सरकार, वक्फ बोर्ड मदत करेल. मात्र माझा सुरु असलेला लढा अन्यायाविरुद्ध सुरु आहे. काही लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी मी लढाई सुरू केली आहे. केंद्रीय संस्थेत असलेली घाण स्वच्छ करण्याचे अभिायान आम्ही हाती घेतले आहे. त्यामुळे अशा कारवाईची चर्चा करुन माझी प्रतिमा मलिन होऊ शकत नाही., असे नवाब मलिक म्हणाले.

मोठ्या लोकांचा हात- तक्रारदार

मी ३ नोव्हेंबरला इडीकडे तक्रार दिली होती. वक्फ बोर्डाच्या मालकीची ही चार हेक्टर जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि या ट्रस्टकडून ही जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली आणि त्यापोटी शासनाने 9 कोटी 60 लाख रुपये त्या ट्रस्टला दिले. छोटेया लोकांच हे काम  नाही, त्यामुळे यामध्ये मोठे लोक सहभागी असू शकतात. मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही . हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेली ही चार हेक्टर जागा आहे. ईडी ने इतक्या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी आहे, असं वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा :ड्रग्स प्रकरणात मलिकांनी आता केली ‘ही’ मागणी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here