Legislative Winter Session : अधिवेशन तोंडावर आहे, जरा सतर्कतेने काम करा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला अद्याप काही दिवस शिल्लक आहेत.

197
Legislative Winter Session : अधिवेशन तोंडावर आहे, जरा सतर्कतेने काम करा
Legislative Winter Session : अधिवेशन तोंडावर आहे, जरा सतर्कतेने काम करा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला (Legislative Winter Session) अद्याप काही दिवस शिल्लक आहेत. असे असले तरी अधिवेशनाचा काळ जवळ येतोय, जरा सतर्कतेने काम करा, असे अखिलित आदेश विदर्भातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागपूर येथे ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे. (Legislative Winter Session)

अधिवेशनात कोणता मुद्दा गाजेल याचा नेम नाही. आयत्या वेळी येणाऱ्या विषयात बळी जातो तो अधिकाऱ्यांचा. विधानसभा (Vidhan Sabha) आणि विधान परिषदेच्या (Legislative Council) आमदारांनी तारांकित आणि अतारांकित प्रश्न, हक्कभंग प्रस्ताव आणि महत्वाच्या विषयांवर विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्याची तयारी चालविली आहे. कोणता विषय कोणत्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शेकेल याचा काही नेम नाही. (Legislative Winter Session)

(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील काम अंतिम टप्प्यात, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न)

हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक लोकप्रतिनिधींचा रोष विविध विभागातील अधिकाऱ्यांवर असतो. यंदा आंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यावर बीडमध्ये झालेला हल्ला, मराठा (Maratha reservation) आणि ओबीसी आरक्षण (OBC reservation), अकोल्यातील जातीय दंगल, पूर्व विदर्भातील धान खरेदी, बुलढाणा, सातारा जिल्ह्यातील सोशल मीडियावरील आपत्तीजनक पोस्ट, विदर्भातील बलात्काराच्या घटनांवरून राजकारण तापत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे आमदार गृह विभागाला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे वरिष्ठांकडून आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Legislative Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.