महाविकास आघाडीच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेल्या मात्र वर्क ऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. संबंधित कामाचे बजेट मंजूर असताना आणि सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली असताना, अशी कामे थांबवता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हजारो कोटींची कामे रखडली होती
महाविकास आघाडीच्या काळात मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि कार्यारंभ आदेश निघालेल्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ग्रामविकास विभागाने 19 जुलै आणि 25 जुलै रोजी महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली तसेच वर्क ऑर्डर निघालेल्या कामांनाही स्थगिती दिली होती. 1 एप्रिल 2021 पासून मंजूर झालेली हजारो कोटींची कामे यामुळे रखडणार होती. या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयात दाददेखील मागितली होती. दरम्यान, 12 डिसेंबर रोजी याप्रकरणी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.
( हेही वाचा: मुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू; ‘या’ गोष्टींवर येणार निर्बंध )
Join Our WhatsApp Community