- वंदना बर्वे
संघ म्हटलं की प्रत्येकाला आठवतं ते नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे (RSS) मुख्यालय. मात्र आता स्वयंसेवकांना प्रेरणा देण्यासाठी देशाच्या राजधानीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नव्या मुख्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिल्लीतील झंडेवालान येथे ‘केशवकुंज’ हा भव्य दिव्य परिसर अडीच एकरातील जागेवर थाटात उभा राहिला आहे. येत्या काळात ‘केशवकुंज’ स्वयंसेवकांना प्रेरणा देण्यासाठी तत्पर असेल. एवढेच नव्हे तर संघाच्या चळवळीचे कार्यक्षेत्र देखील असेल.
गेल्या काही दिवसांपासून शिफ्टिंग काम सुरु आहे. देशाच्या राजधानीत आरएसएसचे (RSS) नवे मुख्यालय तयार झाले आहे. यामुळे सरसंघचालक मोहन भागवत लवकरच दिल्लीतील ‘केशवकुंज’ या संघाच्या नव्या मुख्यालयात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजधानीत सुरु झाली आहे. झंडेवालान मंदिराजवळ ही इमारत आहे. सुरक्षा व्यवस्थेतबाबतचे मॉकडील नुकतेच करण्यात आले. खरं तर सत्ताधारी भाजपाचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नव्या मुख्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. देशाच्या राजधानीत आरएसएसचे नवे मुख्यालय तयार झाले आहे. झंडेवालान मंदिराजवळ ही इमारत आहे.
(हेही वाचा – Online Gaming च्या चिनी घोटाळ्याचा ईडीकडून पर्दाफाश!)
तसेच आरएसएस चे मुखपत्र असलेले पांचजन्य आणि ‘ऑर्गनाइजर’ चे कामही येथून चालणार आहे. दिल्लीतील संघाचे कार्यालयही या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. ‘केशवकुंज’ वर CCTV ची नजर असणार आहे, सुरक्षेसाठी CISF चे जवान तैनात असणार आहेत. RSS प्रमुख डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांचा पुतळा या परिसरात आहे. संघाच्या संबधित विविध संघटना, संस्था यांची कार्यालयही या ठिकाणी असणार आहेत. आठ वर्षांपासून या इमारतीचे काम सुरु होते.
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज इमारत
केशवकुंजमधील पहिल्या टॉवरमध्ये पांचजन्य आणि ‘ऑर्गनाइजर’ यांचे कार्यालय आहेत. दिल्लीतील संघाचे कार्यालयही या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. अडीच एकर परिसरात असणाऱ्या ‘केशवकुंज’ मध्ये मोठे वाहनतळ उभारण्यात आले आहे. याठिकाणी २०० कार पार्क करता येणार आहेत. या इमारतीत २० खाटांचे छोटेखानी रुग्णालय उभारण्यात आले आहे. बारा मजल्यांच्या ‘केशवकुंज’ या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र व ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ (सीसी) मिळाले आहे.
(हेही वाचा – Amit Shah यांची राहुल गांधींवर सडकून टीका; म्हणाले, राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म माहिती आहे का ?)
केशवकुंजमध्ये तीन टॉवर असून प्रत्येक टॉवरमध्ये १२ मजले आहेत. यामध्ये एकूण १३ लिफ्ट आहेत. येथे कार्यालयासोबत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह, सहकार्यवाह आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान असणार आहे. प्रत्येक टॉवरवर ८० खोल्या आहेत. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघ या संस्थेची सुरुवातीची प्रेरणा म्हणजे चारित्र्य प्रशिक्षण देणे आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी “हिंदू शिस्त” लावणे. हिंदुत्वाची विचारधारा हिंदू समाजाला “बळकट” करण्यासाठी प्रसारित करणे आणि भारतीय संस्कृती आणि तिची सभ्यता मूल्ये टिकवून ठेवण्याच्या आदर्शाला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आरएसएस (RSS) ची स्थापना १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community