बांगलादेशात (Bangladesh) हिंदु पोलिसांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. तसेच नव्या भरतीमध्ये हिंदूंचा समावेश केला जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. हे सर्व काम बांगलादेशाचे अंतरिम सरकार करत आहे. बांगलादेशाच्या पोलीस प्रमुखांनाही यासाठी सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार बांगलादेशामध्ये अलीकडेच १०० हिंदु पोलीस अधिकार्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
हे अधिकारी महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस अधीक्षक अशा पदांवर तैनात होते. त्यांच्याकडे जिल्ह्यापासून मोठ्या विभागापर्यंतचे दायित्व होते. त्यांच्या जागी इस्लामी कट्टरतावादी असलेल्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. हे नवे अधिकारी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.
१ हजार ५०० हिंदु उमेदवारांचे अर्ज रद्द
बांगलादेशात (Bangladesh) शेख हसीना सरकारच्या काळात ७९ हजार पोलिसांची भरती गेल्या वर्षी करण्यात आली होती. आता ती रहित करण्यात आली आहे. त्यामुळे १ हजार ५०० हिंदु उमेदवारांचे अर्जही रद्द करण्यात आले आहेत. त्याच्या जागी नवीन भरती होणार आहे. त्यात हिंदु उमेदवार घेतले जाणार नसल्याचा दावा केला जात आहे. या आदेशासाठी बांगलादेशाचे पोलीस प्रमुख बहारुल इस्लाम यांना विशेष सूचना देण्यात आली आहे. पात्र असूनही हिंदूंची निवड केली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. याखेरीज नोकरशाहीत त्यांच्या प्रवेशावरही बंदी आहे.
Join Our WhatsApp Community