Theft in Temple : समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात चोरी; पुजाऱ्याला बांधून पळवले दागिने

50
Theft in Temple : समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात चोरी; पुजाऱ्याला बांधून पळवले दागिने
Theft in Temple : समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात चोरी; पुजाऱ्याला बांधून पळवले दागिने

समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) यांनी स्थापन केलेल्या ११ मारूतींपैकी १ असलेल्या आणि सातपुड्याच्या पायथ्याशी, तसेच मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान मंदिरात दरोडा (Crime News) पडला आहे. (Theft in Temple)

(हेही वाचा – Rishabh, Yashasvi to Play Ranji : रिषभ, यशस्वी रणजी करंडक सामन्यांत खेळणार )

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात हे मंदिर आहे. मंदिरात चोरी करतांना दरोडेखोरांनी हनुमानाचे दागिने लांबविले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधून जवळपास साडे पाच किलो चांदीचे दागिने आणि दान पेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोर पोबारा झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन जागृत हनुमानाचे मंदिर आहे. अनेक राज्यांतून भाविक या ठिकाणी येत असतात. गत आठवड्यातच चंद्रपूर येथील मंदिरात चोरी झाली होती. आता बुलढाणा जिल्ह्यातही तेच घडत आहे. हिंदूंची मंदिरे असुरक्षित झाली असून सरकारने त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (Theft in Temple)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.