Shivsena Dasara Melava : …त्यांचे प्रेम बाळासाहेबांच्या विचारांवर नाही, संपत्तीवर; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

72
Shivsena Dasara Melava : ...त्यांचे प्रेम बाळासाहेबांच्या विचारांवर नाही, संपत्तीवर; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Shivsena Dasara Melava : ...त्यांचे प्रेम बाळासाहेबांच्या विचारांवर नाही, संपत्तीवर; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या ठेवींमधील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. (Shivsena Dasara Melava) बँकेने त्याला नकार दिला. त्यानंतर निर्लज्जाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले, मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले. कारण यांचे प्रेम बाळासाहेबांच्या विचारांवर नाही, तर संपत्तीवर आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घव ठाकरेंवर नाव न घेता चढवला. (Shivsena Dasara Melava)

(हेही वाचा – BJP On UBT Shivsena Dasara Melava : शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांची सभा; भाजपाची टीका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या वतीने आझाद मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलतामा शिंदे म्हणाले, आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभे करून घेतले नाही, त्यांच्यासोबत हे आज गेले. आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील. (Shivsena Dasara Melava)

आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे. आज आझाद मैदानावर हा ‘आझाद’ असा मेळावा होतोय. आझाद मैदानाला देखील इतिहास आहे. अशा आझाद मैदानावर हा शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. पहाटेपासून लोक आले आहेत. इतर समाजाचाही आपण आदर करतोय. त्यांचा सन्मान करत आपण पुढे जातोय. अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसला आहे. शिवसैनिक म्हणून साबीर शेख बाळासाहेब यांच्या काळात मंत्री होते, हे आमचे हिंदुत्व आहे ही आमची शिवसेना आहे, असेही शिंदे म्हणाले.

सत्तेसाठी तडजोड करणार नाही !

आम्ही सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही, करणार नाही. म्हणून आज अब्दुल सत्तारही आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली. (Shivsena Dasara Melava)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.