Narendra Modi : त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

Narendra Modi : हा अपमान विसरता येणार नाही. जे स्वतः शुद्धीत नाहीत, ज्यांची संवेदना संपुष्टात आली आहे, ते काशी, उत्तरप्रदेशच्या मुलांना अमली पदार्थांचे व्यसनी म्हणत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

267
Narendra Modi : त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार
Narendra Modi : त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन झाल्यापासून रिक्षा चालक, फुल विक्रेते आणि होडीचालक यांच्या रोजगारात वाढ झाली आहे. घराणेशाहीमुळे उत्तर प्रदेशचा विकास थांबला होता. घराणेशाहीने तरुणांचे भविष्य बिघडवले आहे. काँग्रेसच्या राजघराण्याचे युवराज म्हणतात की, काशीचे तरुण व्यसनाधीन आहेत. बोलतांना त्यांना आता भानही राहिलेले नाही. माझ्या काशीतील तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसनी म्हणून संबोधत आहेत. आता त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. त्यांना तरुणांच्या प्रतिभेची भीती वाटते. काशी आणि अयोध्येचे बदलले स्वरूप हे त्यांच्या रागाचे मुख्य कारण आहे. काशी आणि अयोध्येचे नवे रूप, जे त्यांना आवडत नाही, असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला आहे.

(हेही वाचा – Manohar Joshi आणि Vikram Savarkar यांच्यात विलक्षण साम्य)

ते वाराणसी (Varanasi) दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. वाराणसी भेटीच्या वेळी पंतप्रधान मोदींनी बनास डेअरी प्लांटसह १०,९७२ कोटींच्या २३ विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. ३,३४४ कोटी किमतीच्या १२ पेक्षा अधिक प्रकल्पांची पायाभरणी केली. अमूलच्या सर्वात मोठ्या प्लांटचे, काशी बनास डेअरी कॉम्प्लेक्सचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यापूर्वी काशीची मुले व्यसनाधीन असल्याचे विधान केले होते. त्या विधानाचा समाचार मोदी यांनी घेतला आहे.

पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले की, हा अपमान विसरता येणार नाही. जे स्वतः शुद्धीत नाहीत, ज्यांची संवेदना संपुष्टात आली आहे, ते काशी, उत्तरप्रदेशच्या मुलांना अमली पदार्थांचे व्यसनी म्हणत आहेत. इंडि आघाडीने उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) तरुणांचा केलेला अपमान कधीही विसरता येणार नाही. (Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.