#TheKashmirFiles: गोवा, महाराष्ट्रात आता ‘फिल्म जिहाद’

158

३० वर्षांपूर्वी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे देशाचे नागरिक असलेल्या काश्मिरी पंडितांना आपल्याच देशात विस्थापित व्हावे लागले. स्वातंत्र्यानंतर ४ दशके उलटली तरीही फाळणीच्या वेळी धर्मांध मुसलमानांचा उन्माद हिंदूंना अनुभवायला मिळाला होता आणि तेव्हाही काँग्रेसचे पळपुटे धोरण दिसून आले. आजही जेव्हा दी काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या माध्यमातून त्या घटनेला उजाळा दिला जात असताना देशभरात हा चित्रपट दाबून फिल्म जिहाद सुरू आहे.

जागा रिकाम्या तरी बोर्ड हाऊसफुल्ल

गोवा असो वा भिवंडी या ठिकाणी चित्रपटगृहात जागा शिल्लक असतानाही बाहेर मात्र ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावला जात आहे. तिकीट विक्री दाबून ठेवली जात आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यापासून वंचित ठेवले जात आहे. गोव्यातील ओशिया कमर्शियल आर्केडमध्ये असलेल्या ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. १२ मार्च या दिवशी या चित्रपटाच्या खेळाला ३० ते ४० टक्के जागा रिकाम्या असतांना चित्रपटगृहाबाहेर ‘हाऊसफूल’चा बोर्ड लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच ‘बूक माय शो’ या चित्रपट पहाण्यासाठी ऑनलाइन आरक्षण (बुकिंग) करणार्‍या संकेतस्थळावरही ‘हाऊसफूल’ची सूचना प्रसारित करण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ जयेश नाईक आणि इतर हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘आयनॉक्स’च्या व्यवस्थापकांना खडसावले. त्या वेळी व्यवस्थापकांनी यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली.

(हेही वाचा TheKashmirFiles काश्मिरी पंडिताचा आवाज पुन्हा दाबण्याचा प्रयत्न झाला, पण…)

धर्मांध मुसलमान बरीच तिकिटे घेवून हिंदूंना वंचित ठेवतात?

गोवा राज्यात अनेक चित्रपटगृहे असतांनाही आतापर्यंत केवळ ३ चित्रपटगृहांमध्येच ‘दी कश्मीर फाइल्स’ लागला असल्याची माहितीही समोर आली आहे. यामध्ये मडगाव येथील ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहात केवळ १ खेळ, पणजी येथील डीबी रोडवर असलेल्या ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहातही १ खेळ, तर बार्देश तालुक्यातील मॉल दे गोवा येथील ‘ऑयनॉक्स’ चित्रपटगृहात २ खेळ असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे ‘पोस्टर’ चित्रपटगृहाच्याबाहेर लावलेले आहेत; मात्र चित्रपटगृहात ‘दी कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊनही त्याचे एकही ‘पोस्टर’ चित्रपटगृहाच्या बाहेर का लावलेले नाही ? ‘दी कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चालू असतांना चित्रपटगृहात ३० ते ४० टक्के जागा रिक्त असतांनाही चित्रपट ‘हाऊसफूल’ असल्याचे चित्रपटगृहाचे व्यवस्थापन कोणत्या आधारावर सांगते? अशी विचारणा केली असता चित्रपटगृहातील रिक्त जागांची तिकिटांची विक्री झालेली असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे होते, मग ही तिकिटे कुणी विकत घेतली, अस प्रश्न निर्माण झाला आहे.

मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटाला विरोध?

भिवंडीतील पी.व्ही.आर्. चित्रपटगृहात ११ मार्च या दिवशी खेळ चालू असतांना सुरुवातीपासून आवाज नीट ऐकू येत नव्हता. त्याविषयी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे जाऊन अनेकदा तक्रार केली, तरी व्यवस्थापनाने विशेष दाद दिली नाही. अखेरीस प्रेक्षक संतापले आणि सर्वांनी अभूतपूर्व एकजूट दाखवून चित्रपट बंद करून व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी प्रेक्षकांचे म्हणणे ऐकून घेऊन व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर चित्रपट पुन्हा व्यवस्थित आवाजात चालू करण्यात आला. पोलिसांशी चर्चा करतांनाही प्रथम पोलिसांनी ‘तुम्हाला पैसे परत हवे आहेत का ?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर प्रेक्षकांनी त्यांना सांगितले, ‘‘पैशांचा प्रश्‍न नाही. चित्रपट बघायचा आहे. येथे चित्रपटगृहात अधिक जागा शिल्लक असूनही बाहेर ‘हाऊसफूल’ (जागा भरल्या आहेत) असा फलक लावण्यात आल्याचेही होता. ‘सिटी सेंटर’ या अन्य एका चित्रपटगृहातही अशाच प्रकारे घटना घडल्याचे एका प्रेक्षकाने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.