तर मग काँग्रेसने केंद्रातही स्वबळावर येऊन दाखवावे! संजय राऊतांच्या टोला 

अनलॉकबाबत विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरुन थोडीफार गडबड झाली. पण महाविकास आघाडीत असे होत राहतेच. मात्र राज्यातले सरकार नीट चालले आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

74

काँग्रेस स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल, तर आमच्या शुभेच्छा, स्थानिक पातळीवर आघाडीने एकत्र लढावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नाना पटोले स्वबळावर लढणार असतील, तर तो त्यांचा निर्णय असेल. पण मग केंद्रातही स्वबळावर निवडून यावे, आम्ही पाठिंबा देऊ, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला हाणला.

चंद्रकांत पाटलांनी बोलताना भान ठेवावे!

राऊत हे पुण्यात माध्यमांशी बोलत होते. राऊत यांनी फडणवीस यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना टोमणा मारला. प्रभाग तोडफोडीचा आरोप करणाऱ्या भाजपने गेल्यावेळी पुण्यात तेच केले, असे म्हणत पाठीत खंजीर खूपसणे ही सेनेची संस्कृती नाही, असे राऊत यांनी म्हटले. तसेच चंद्रकांत पाटील म्हणजे काही वसंतदादा पाटील नाहीत त्यांनी बोलताना भान ठेवावे, असा सल्ला राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.

(हेही वाचा : धक्कादायक! केरळमध्ये लसीकरणासाठी मुसलमानांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित!)

महविकास आघाडीत थोडीफार गडबड!

जिथं सेनेचे पाय खेचण्याचे प्रयत्न होतील तिथे तिथे मी जाणार, असे म्हणत आगामी पुणे मनपात सेना किंग किंवा किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडेही आमचे लक्ष आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यात अनलॉकसंदर्भात झालेल्या गोंधळावर भाष्य केले. तसेच अनलॉक होतेय ही चांगली गोष्ट असल्याचे राऊत म्हणाले. अनलॉकबाबत विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरुन थोडीफार गडबड झाली. पण महाविकास आघाडीत हे असे होत राहतेच.मात्र महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित असून राज्यातले आघाडी सरकार नीट चालले असल्याचेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.