गृहमंत्र्यांमुळे आता काँग्रेसमध्येही दोन गट!

आज रात्रीच सविस्तर अहवाल हायकमांडला पाठवला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली आहे.

80

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉंबनंतर गृहमंत्री सध्या रडारवर असताना आता गृहमंत्र्यांमुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. गृहमंत्र्यांवर होत असलेले आरोप खोटे आणि बेछूट असल्याची चर्चा काँग्रेसमधील एका गटात सुरू असून, देशमुखांचा राजीनामा नको असे काँग्रेसमधील या गटाला वाटत आहे. तर चौकशी होईपर्यत देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा, असे एका गटाचे म्हणणे आहे. आज राज्यातील घडामोडींवर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत यावर चर्चा झाली.

भाजपचे आरोप तरीही राष्ट्रवादी का गप्प?

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून विरोधी बाकावर बसलेल्या भाजपकडून आरोप केले जात आहेत. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या आरोपाला उत्तर देण्यात महाविकास आघाडी कमी पडत असल्याची काँग्रेसची भावना आहे. तसेच आरोप होऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री का बोलत नाहीत, असा प्रश्न देखील काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान आज रात्रीच सविस्तर अहवाल हायकमांडला पाठवला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचाः चौकशी वाझेपर्यंत सीमित ठेवण्याचे कारस्थान! रविशंकर प्रसाद यांचा आरोप )

राज्यातील परिस्थितीवर हायकमांड नाराज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर काँग्रेस हायकमांड नाराज असून, महाविकास आघाडीमध्ये सत्तेत सोबत असल्याने काँग्रेसची देखील बदनामी होत असल्याचे हायकमांडचे म्हणणे आहे. याचमुळे हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून अहवाल मागवला आहे.

देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही.  सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचे काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी.

-बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.