राज्यात निर्बंध शिथिल होणार?

येत्या आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले निर्बंध आता शिथिल होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील घटती रुग्णसंख्या, दुकाने, हॉटेल्सवरील निर्बंध टप्प्या-टप्प्याने कसे हटवता येतील, याबाबतचा सविस्तर अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. आता लवकरच यावर निर्णय होणार असून, येत्या ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकारच्या हालचाली सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर, बेड्सची संख्या आणि इतर काही निकषांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आल्यानंतर, आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये दुकानं, हाॅटेल्स, ट्रेन आणि इतर वेळा वाढण्याचा विचार सरकार करत असून, या आठड्याभरात निर्णय होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः ठाण्याच्या बारमधील वसुली किती आणि कुणासाठी ?)

लोकलबाबतही निर्णय होणार?

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास बंद करण्यात आला असून, लोकल प्रवास कधी सुरू होणार, याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे. एप्रिल महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सुरू करावी, असा सूर आता समाज माध्यमांतून उमटू लागला आहे. राज्य सरकार आता याबाबत देखील विचार करत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा देखील कमी होत असून, लोकल सुरू करण्याबाबत देखील सरकार सकारात्मक असल्याचे समजते. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. येत्या आठवड्यात यावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः देशात कुणीही सुरक्षित नाही! फोन टॅपिंगवरून संजय राऊतांचा टोला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here