राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे NCP अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांनाच विचारणा केली आहे. अजित पवार गटाने शरद पवारांची हकालपट्टी केली, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असा होतो, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
भाजपसोबत हातमिळवणी केली, हा पक्षद्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली. त्याचपद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून NCP एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरोधात भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्या पक्षाने अजित पवारांसह काही प्रमुख लोकांची हकालपट्टी केली. याला फूट नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? , असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा Neeraj Chopra : नीरज चोप्रा जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल; ऑलिम्पिकचे तिकीट केले पक्के)
एका गटाने भाजपसोबत ईडीच्या भितीने हातमिळवणी केली आहे आणि स्वतः शरद पवार आणि त्यांचे सगळे प्रमुख सहकारी, समर्थक, त्यांना मानणारा जो वर्ग आहे, जो एका वैचारिक लढ्याचे नेतृत्त्व करतोय. शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मानतोय, तो मोठा गट आज महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीने ठरवलेले आहे. येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात किंवा देशपातळीवर भाजपचा पराभव करायचा, असेही संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community