Dasara Melava 2023 : यंदाच्या दसरा मेळाव्यात तिसऱ्या पिढीतील ठाकरेंचे विचार?

शिवसेना फुटल्यानंतर दुसरा दसरा मेळावा दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवतिर्थावर होत आहे.

219
Dasara Melava 2023 : यंदाच्या दसरा मेळाव्यात तिसऱ्या पिढीतील ठाकरेंचे विचार?
Dasara Melava 2023 : यंदाच्या दसरा मेळाव्यात तिसऱ्या पिढीतील ठाकरेंचे विचार?

शिवसेना फुटल्यानंतर दुसरा दसरा मेळावा दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवतिर्थावर होत आहे. उबाठा गटाच्या शिवसेनेचा शिवतिर्थावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यनेते असलेल्या शिवसेनेचा आझाद मैदानात दसरा मेळावा होत आहे. परंतु उबाठा शिवसेनेच्या शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यात आजवर कधीही भाषण न करणाऱ्या मुख्य वक्त्यांपासून दुर राहणाऱ्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे मुख्य वक्ते म्हणून नवीन यादीत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात ते प्रथमच भाषण करण्याची शक्यता वर्तवली जात असून खुद्द शिवसेना उबाठा पक्षांच्या नेत्यांची आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाषण करून सरकारचा समाचार घ्यावा अशी इच्छा असल्याचे बोलले जात आहे. (Dasara Melava 2023)

शिवसेना पक्षांचा परंपरागत दसरा मेळावा शिवतिर्थावर होत असून मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा शिवतिर्थावर आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा बीकेसीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु, या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी भाषण केले नव्हते. परंतु ज्याप्रकारे आदित्य ठाकरे सरकारचा समाचार घेत आहेत. तसेच भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे हे आता पक्षाचे नेते असल्याने पक्षाची मदार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हेही सांभाळत आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचा मुख्य वक्त्यांच्या यादी नाव समाविष्ट करून त्यांनी यावर्षी आपले भाषण करून शिवसैनिकांमध्ये आपल्या ज्वलंत विचारांचे सोने वाटावे अशी अशी इच्छा शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांची आहे. (Dasara Melava 2023)

(हेही वाचा – Shastra Poojan : शस्त्रपूजनावेळी शपथ घ्या… देशाला गरज भासेल तेव्हा ते शस्त्र मी हाती घेईन मंजिरी मराठे यांचे आवाहन)

शिवसेनेमध्ये सुभाष देसाई, संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, सुनील प्रभू, रविंद्र वायकर, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत आदी वक्त्यांची मांदियाळी असली तरी यंदा नितीन बानगुडे पाटील यांच्यासह आदित्य ठाकरे यांचेही भाषण व्हावे अशी नेत्यांची इच्छा आहे. याच शिवतिर्थावर आदित्य ठाकरे यांनी राजकारणात आजोबा अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी युवा सेनेचे नेतृत्व करत शिवसेना नेते, आमदार तसेच पर्यावरण मंत्री तसेच पालकमंत्री आदी पदे भुषवली आहेत. तसेच उबाठा शिवसेनेची सर्व कारभार हा आदित्य ठाकरे हेच सांभाळत असल्याने या दसरा मेळाव्याच्या निमित्तने त्यांच्यावर पक्षाचे शिवधनुष्य पेलण्याची नवीन जबाबदारी वक्त्यांच्या रुपात सोपवण्याचा विचार सुरु असून यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची दाट शक्यता वर्तवण्यता येत आहे. (Dasara Melava 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.