मथुरा, वाराणसीत मंदिरे उभारण्यासाठी भाजपाला ४०० पार करा; Himanta Biswa Sarma यांचे आवाहन

220
भाजपला 300 जागा मिळाल्यावर अयोध्येत राम मंदिर बांधले आणि यावेळी जर भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्यात यशस्वी ठरला तर कृष्णजन्मभूमी मथुरा आणि वाराणसीमध्ये मंदिर बनवले जाईल. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके देखील परत घेतले जाईल, असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) म्हणाले. ते एका प्रचारसभेला संबोधित करत होते.
‘जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की, एक काश्मीर भारतात आहे आणि दुसरे पाकिस्तानमध्ये आहे. पीओके खरोखर आमचा आहे यावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही. सध्या पीओकेमध्ये दररोज निदर्शने होत आहेत आणि पाकिस्तानमधील लोक भारताचा तिरंगा झेंडा घेऊन पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. जर मोदींना 400 जागा मिळाल्या तर पीओके देखील भारताचा एक भाग होईल आणि हे देखील सुरू झाले आहे. पीओकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. पिठाच्या वाढत्या किमती, वीज बिलांचे वाढलेले दर, अनुदानात कपात अशा मागण्या घेऊन पीओकेचे लोक पाकिस्तान सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीओकेमध्ये सुरू असलेल्या गदारोळावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की पीओके हा भारताचा भाग होता आणि नेहमीच राहील, असेही मुख्यमंत्री सरमा (Himanta Biswa Sarma) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.