महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांपैकी भाजपाने (BJP) पहिल्या प्रथम उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 99 उमेदवारांची यादी भाजपाने जाहीर केली आहे. त्यात मुंबईमधील 14 उमेदवार आणि महामुंबईत 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश ठिकाणी सीटिंग आमदारांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे दिसत आहे.
मुंबईत एकच नवीन चेहरा
मुंबईमध्ये १४ पैकी केवळ एकाच ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये मालाड (प.) येथे विनोद शेलार हा नवीन चेहरा दिला आहे. बाकी १३ ठिकाणी भाजपाने (BJP) सीटिंग आमदारांवरच विश्वास टाकला आहे. दुसरीकडे महामुंबईपैकी १० ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे.
(हेही वाचा BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू)
महामुंबईत 2 नवीन चेहरे दिले
नालासोपारा आणि कल्याण या ठिकाणी भाजपाने नवीन चेहरा दिला आहे. त्यात नालासोपारामध्ये राजन नाईक यांना, तर कल्याण (पू.) येथून गोळीबारप्रकरणी कारागृहात असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित ८ ठिकाणी भाजपाने जुन्या चेहऱ्यांवरच विश्वास टाकला आहे.
एकंदरीत भाजपाने (BJP) या निवडणुकीत नवीन चेहरे देऊन नव्याने संसार थाटण्याचा प्रयत्न न करता जे आधीपासून आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी देवून रिस्क घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांना उमेदवारी जाहीर करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community