अबब! देशात ८० हजार कोटी रुपयांची रक्कम ‘बेवारस’!

108

देशात सध्या कुठे, किती पैसा पडून असेल हे सांगता येत नाही. त्या पैशाला वारस असतोच असे नाही, काही पैसा बेवारसही असू शकतो, यावर विश्वात बसत नसेल, तरी विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण देशभरात बेवारस राक्कम समोर आली आहे. ती रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल ८० हजार कोटी इतकी आहे. त्यामुळे आता या रकमेचे वारसदार भेटतात की, रकम सरकारी तिजोरीत जमा होणार, हे पाहावी लागणार आहे.

कुठे किती रक्कम?  

देशात भविष्य निर्वाह निधी (EPFO) कडे सुमारे २६ हजार ४९७ कोटी रुपये, सर्व बँक खात्यांमध्ये १८ हजार ३९१ कोटी रुपये, म्युच्युअल फंडांमध्ये १७ हजार ८८० कोटी रुपये आणि विमा कंपन्यांकडे १५ हजार १६७ कोटी रुपये पडून आहेत. फिक्स मुदत ठेवींमध्ये ४ हजार ८२० कोटी रुपयांच्या अघोषित ठेवी जमा आहेत.

(हेही वाचा : किरीट सोमय्या माफी मागणार का?)

नॉमिनी दिला नसल्यामुळे समस्या!

पीएफ खात्यात सुमारे २६ हजार ४९७ कोटी रुपये जमा आहेत. ज्याचे कोणीही वारसदार किंवा दावेदार नाहीत आणि ही रक्कम हळूहळू वाढत आहे. त्याचप्रमाणे बँकेत अनेक मुदत ठेवी आहेत, ज्यांचे दावेदार मुदतपूर्तीनंतरही आलेले नाहीत. अनेक लोकांनी नॉमिनी दिला नसल्याने बँक, डिमॅट आणि इतर खात्यांमध्ये ८० हजारांपेक्षा जास्त रक्कम पडून आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.